Bihar Election 2025: माझी काय चूक? पक्षश्रेष्ठींनी सांगावं; टिकीट कापल्यावर महिला आमदाराला अश्रु अनावर!

Bihar Assembly BJP candidate list Kusum Devi Denied Ticket: "२० वर्षापासून मी भाजपात एकनिष्ठ आहे. पक्षाची सेवा केली, जेव्हा पक्षाला गरज होती, तेव्हाही जनतेत जाऊन काम केले. पक्षाने आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा असं सांगितले होते,"
 Bihar Assembly BJP candidate list Kusum Devi Denied Ticket
Bihar Assembly BJP candidate list Kusum Devi Denied TicketSarkarnama
Published on
Updated on

बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपने 101 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यावरुन नाराजीनाट्य रंगले आहे. गोपालगंज सदरच्या विद्यमान आमदार कुसुम देवी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. तिकीट कापल्याचे समजताच कुसुम देवी आणि त्याचे सुपुत्राला अश्रु अनावर झाले.

गोपालगंज सदर येथून कुसुम देवी या भाजपकडून पाच वेळा निवडून आल्या आहेत. यावेळी पक्षाने त्यांच्याऐवजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष सिंह यांना गोपालगंज सदर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षावर विश्वासघात केल्याचा आरोप कुसुम देवी आणि त्यांचा मुलगा अनिकेत सिंह यांनी केला आहे.

एकीकडे महिला सशक्तीकरणावर बोलायचे आणि दुसरीकडे माझ्यासारख्या महिलेवर अन्याय करायचा असे त्या म्हणाल्या. "२० वर्षापासून मी भाजपात एकनिष्ठ आहे. पक्षाची सेवा केली, जेव्हा पक्षाला गरज होती, तेव्हाही जनतेत जाऊन काम केले. पक्षाने आम्हाला उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा असं सांगितले होते," असे त्या म्हणाल्या. माझी चूक काय होती हे पक्षाने सांगावे, असा सवाल त्यांनी पक्षश्रेष्ठींना केला आहे.

कुसुम देवी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल आणि नेते मिथिलेश तिवारी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. टिकट कापल्यानंतर त्यांनी पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. आज आपल्या समर्थकांसोबत त्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर गोपालगंज आणि बैकुंठपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत.

 Bihar Assembly BJP candidate list Kusum Devi Denied Ticket
Dattatray Bharne: शेतकऱ्यांना मिळणार आता 2 लाख रुपये! कृषिमंत्री भरणेंची घोषणा

पाच वेळा निवडणूक आलेल्या कुसुम देवी यांच्या परिवाराचा या मतदारसंघात दबदबा आहे. त्याचे दिवंगत पती सुबास सिंह हेही चारवेळा आमदार होते. भाजपने बुधवारी सांयकाळी 18 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण 101 जागांवरील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहैत. बिहारमध्ये एकूण 243 जागांसाठी दोन टप्प्यात म्हणजे 6आणि 8 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

FAQs (प्रश्नोत्तर)

1. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने किती उमेदवार जाहीर केले आहेत?
भाजपने एकूण 101 उमेदवारांची घोषणा केली आहे.

2. गोपालगंज सदर मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली आहे?
जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

3. कुसुम देवी पक्षावर कोणता आरोप करत आहेत?
त्यांनी पक्षावर विश्वासघात आणि अन्यायाचा आरोप केला आहे.

4. त्या पुढे कोणती भूमिका घेणार आहेत?
त्या अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com