Maharashtra Live Political Updates: अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात,नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

Bihar Assembly Election Result 2025: बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं असून आज १४ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukale sarkarnama
Published on
Updated on

अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात,नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. आता अभिजीत बिचुकले सातारा नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे.

बिबट्याचा धुमाकुळ... संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखला

शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जांभूत आणि पिंपरखेड ही गावे बिबट्याच्या हल्ल्याचे केंद्र बनली असून, केवळ एका महिन्यात पिंपरखेडमध्ये 3 मृत्यू झाले आहेत. 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलाचा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट पुणे-नाशिक महामार्ग 5 तासांहून अधिक काळ रोखून धरला.

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार ? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...

बिहारमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये निवडणुका झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि नितीशकुमार हे एकत्र बसून घेतील. मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.

'बिहारच्या जनतेनं राहुल गांधींना खोटं ठरवलं...'; चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला आहे. राहुल गांधी यांनी मतचोरी, ईव्हीएम हॅक असे आरोप करून फक्त हवा निर्माण केली. मात्र, बिहारच्या जनतेनी त्यांनाच खोटे ठरवले. त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असं म्हटलं.

मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ संशयित बॅग आढळल्यानं खळबळ 

देशाची राजधानी दिल्लीतील कार स्फोट प्रकरण ताजं असतानाच मुंबईत सीएसएमटी बस स्टॉपजवळ लाल रंगाची संशयित बॅग आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.यानंतर आरपीएफ आणि जीआरपीचं पथक देखील पोहोचल्यानंतर ही बॅग उघडण्यात आली. त्यात एक फाईल आणि कपडे आढळून आले. यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

बिहारमध्ये आज घरोघरी मखान्याची खीर बनवली जाणार - PM मोदी 

बिहारच्या जनतेनेचा आज मोठा विजय झाला असून इथल्या घराघरामध्ये आज मखान्याची खीर बनवली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्यालयात जनतेला संबोधित करताना म्हटलं.

CRPFचे डीआयजी कृष्णकांत पांडेंच्या मुलीची नागपूरात गळफास घेऊन आत्महत्या

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डीआयजी कृष्णकांत पांडे यांच्या मुलीची नागपूरात गळफास घेऊन आत्महत्या

- समृद्धी पांडे ही नागपूरातील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती.

- बुधवारी सकाळी तिची मैत्रीण कॅालेजला गेली असता तिने फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

- सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत केली आत्महत्या

- तणावातून समृद्धीने आत्महत्या केल्याची माहिती

- समृद्धी त्वचारोग विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती , ती अभ्यासात हुशार असताना तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास सोनेगाव पोलीस करत आहे.

- यापूर्वी सुद्धा ऑगस्ट महिन्यात वैदकीय अभ्यासक्रमाला असणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली होती..

वोट चोरीचा फेक नरेटिव्ह बिहारच्या जनतेने उधळून लावला - अमित साटम  

वोट चोरीचा फेक नरेटिव्ह बिहारच्या जनतेने उधळून लावल्याचा भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा दावा. विरोधकांनी केलेले वोट चोरीचे आरोप म्हणजे जनतेचा अपमान, जनता निकालातून उत्तर देत असल्याचे साटम यांचे मत. बिहारची निवडणूक म्हणजे ट्रेलर, खरा पिक्चर मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल, असा साटम यांचा विश्वास. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही एनडीएला भरघोस समर्थन मिळेल, असा त्यांनी दावा केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नितीश कुमारांचे कौतुक

बिहारमध्ये मिळालेल्या बहुमतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार आणि बिहारच्या भाजप नेत्यांचे अभिनंदन केले. नागरिकांनी सुशासनाला मतदान केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव आघाडीवर 

17 फेरीमध्ये मोठा उलटफेर होत तेजस्वी यादव यांनी दीड हजार मतांनी आघाडीवर आहेत. 14 फेरीपर्यंत ते तब्बल सात हजारांनी पिछेहाटीवर होते.

तेजस्वी यादव सात हजाराने पिछेहाटीवर 

तेजस्वी यादव हे त्यांच्या राघोपूर मतदारसंघातून तब्बल सात हजाराने पिछेहाटीवर आहेत. 30 पैकी 14 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. मात्र, या फेऱ्यांमध्ये तेजस्वी पिछेहाटीवर पडले असून भाजप उमेदवार सतीश कुमार यांनी आघाडी घेतली आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपकडून जल्लोष

बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपकडून जल्लोष करण्यात आला. भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा केला. गिरीश महाजन यांनीही या उत्सवात सहभागी होत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मैथिली ठाकूर 9 हजार मतांनी आघाडीवर  

भाजपच्या अलीनगरच्या उमेदवार मैथीली ठाकूर 9 हजार मतांनी आघाडीवर.

तेजप्रताप पराभवाच्या छायेत

लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप पराभवाचा छायेत आहे. 25 हजारांनी ते पिछेहाटीवर आहेत. मतमोजणीत ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

Bihar Assembly Election 2025: मतमोजणीत तेजस्वी यादवांना मोठा दिलासा, 585 मतांनी आघाडीवर

बिहार विधानसभेच्या मतमोजणीत सकाळपासून झालेल्या आठ फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव अखेर 585 मतांनी आघाडीवर गेले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'एकदम महाराष्ट्र पॅटर्न! ज्यांच्या विजयाची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले!'

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते. ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले!'

Akhilesh Yadav on Bihar Eection Results : भाजप दल नाही तर छल - अखिलेश यादव

बिहारमधील निवडणूक निकालांवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजप दल नाही तर छल आहे असं म्हटलं आहे.

Bihar Election Result : बिहारमधील लोकांनी जातीची बंधनं तोडून मतदान केलं - संजय निरुपम

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएने घेतलेल्या आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमधील लोकांनी जातीची बंधनं तोडून मतदान केलं. काँग्रेस पक्षासाठी मत चोरीचा कोणताही मुद्दा नव्हता. एसआयआरच्या आधी आणि नंतर एनडीए जिंकला, म्हणजेच मतचोरी हा मुद्दा नव्हता, असं निरूपम यांनी म्हटलं आहे.

दुपारी साडेबारापर्यंत निवडणूक आयोगाची आकडेवारी

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी साडेबारापर्यंत भाजप 86 जागांवर, जेडीयू 78 जागांवर, आरजेडी 31 जागांवर, एलजेपी रामविलास 21 जागांवर, सीपीआयएमएल 6 जागांवर आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.

Bihar Election Result Live : तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव पिछाडीवर

राजद उमेदवार आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत तर त्यांचे भाऊ तेजप्रताप यादवही महुआ मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

पंतप्रधान मोदींवरच लोकांचा विश्वास - चंद्राबाबू नायडू

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. या प्राथमिक कलांवर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहार निवडणुकीच्या कलांवरून जनता नरेंद्र मोदींसोबत असल्याचे दिसत आहे. इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जनतेचा पंतप्रधान मोदींवर जास्त विश्वास आहे, असं नायडू यांनी म्हटलं आहे.

Bihar Election Results 2025 : अलीनगरमधून मैथिली ठाकूर 8,500 मतांनी आघाडीवर

भाजपची बहुचर्चित उमेदवार मैथिली ठाकूरने अलीनगरमधून मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या सहा फेऱ्यांनंतर आरजेडीच्या विनोद मिश्रा यांच्यापेक्षा 8,544 मतांनी मैथिलीने आघाडी घेतली आहे.

Bihar Election Results 2025 : BJPचे दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर

भाजपाचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय कुमार हे बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचे दिसत आहे. हाती येत असलेल्या कलांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.

bihar vidhan sabha result 2025: पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असल्याचे दिसते. तर आरजेडीचे बहुसंख्य उमेदवार पिछाडीवर असून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत.

बसपाचे सतीश कुमार सिंह ये रामगढ़मधून आघाडीवर

  • एनडीए 166 जागांवर आघाडीवर

  • दरभंगा येथून संजय सरावगी आघाडीवर

  • तारापुरमधून सम्राट चौधरी पुढे

  • छपरा सीट येथून खेसारी लाल यादव पिछाडीवर, भाजपाच्या छोटी कुमारी आघाडीवर

  • पवन सिंह यांची पत्नी ज्योति सिंह काराकाट येथे पिछाडीवर

  • बसपाचे उमेदवार सतीश कुमार सिंह ये रामगढ़मधून आघाडीवर

bihar vidhan sabha result 2025, कॉंग्रेसचा बिहारमधून सुपडासाप होणार..

विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कौल पुढे येताना दिसत आहे. कॉंग्रेसचा सुपडासाप होत असल्याच सध्याचे चित्र आहे.

Bihar Election Result 2025 Live : महुआ मतदारसंघात तेजप्रताप यादव २ हजार मतांनी पिछाडीवर

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मोठ्या मुलाला महुआ विधानसभा मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. आत्ताच्या कलांमध्ये महुआ मतदारसंघात तेज प्रताप २००० हून अधिक मतांनी मागे आहेत. तेज प्रताप यांचे मुख्य प्रतिस्पर्धी रामविलास पासवान लोजपाचे संजय कुमार सिंह आहेत.

Bihar Assembly Election Results 2025 :लालूच्या आरजेडीला मोठा ब्रेक

जेडीयूने इतिहास रचला असून नितीश कुमार यांचा पक्ष 73 जागांवर आघाडीवर आहे. त्यांना लालूच्या आरजेडीला मोठा ब्रेक लावला आहे.

माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर

Bihar Election Result update : नितीश कुमार यांचा करिष्मा कायम

बिहारच्या निकालामध्ये नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानेही मोठी आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांचा करिष्मा अजूनही बिहारमध्ये कायम असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 166 मतदारसंघातील कलांमध्ये जेडीयूला 55 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजपची आघाडी 49 जागांवर आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत जेडीयूच्या जागांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Bihar Election Result 2025 : भाजपला मोठी आघाडी

बिहारच्या निकालमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत कलांमध्ये भाजपला ७८ पैकी २८ जागांवर आघाडी आहे. त्यापाठोपाठ जेडीयू २० आणि आरजेडी १७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला आघाडी असलेल्या एकूण जागांएवढ्या जागाही महाआघाडीला अद्याप मिळालेल्या नाहीत.

Lalu Prasad Yadav News : लालूंचा लेक पिछाडीवर

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये एनडीएने आतापर्यंत मोठी आघाडी घेतली आहे. महाआघाडीची पीछेहाट झाली आहे. महुआ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजप्रताप यादव मैदानात उतरले आहे. ते पिछाडीवर पडल्याचे वृत्त आहे.

Election Commission update : अधिकृत कलांमध्ये भाजपला आघाडी

बिहारमध्ये मतमोजणीची अधिकृत माहिती देण्यास भारतीय निवडणूक आयोगाने सुरूवात केली आहे. त्यानुसार ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या फेरीमध्ये पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Bihar Result live : टपाली मतदानात एनडीएला मोठी आघाडी

बिहार विधानसभेच्या निकालामध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएला मोठी आघाडी मिळाली आहे. टपाली मतदानामध्ये एनडीएच्या उमेदवारांना पसंती मिळताना दिसत आहे. एनडीएने जागांचे अर्धशतक पार केले आहे.

Bihar Election 2025 Live : सात राज्यांमध्येही मतमोजणीला सुरूवात

बिहारसोबतच इतर काही राज्यांतील पोटनिवडणुकांसाठीही मतदान झाले होते. झारखंड, पंजाब, राजस्थान, ओडिशा, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन जागांवर मतदान झाले होते. तिथेही मतमोजणी सुरू झाली आहे.

Bihar Election Result : मतमोजणीला सुरूवात

बिहारमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला टपाली मतांची मोजणी केली जात आहे. सकाळी ८.३० वाजता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यानंतर काही वेळातच सुरूवातीचे कल हाती येण्यास सुरूवात होईल.

Bihar Election Result 2025 LIVE : बिहारमधील एक्झिट पोल खोटे, विजय वडेट्टीवार यांचा दावा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकी संदर्भातील सर्व एक्झिट पोल खोटे आणि दिशाभूल करणारे असल्यांचं म्हटलं आहे. शिवाय निकालानंतर महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. जनतेचा मूड पूर्णपणे सरकारच्या विरोधात आहे, असंही ते म्हणाले.

Bihar Assembly Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये भाजप-जेडीयू युतीचं सत्ताधारी एनडीए सरकार पुन्हा सत्तेत पुनरागमन करणार की काँग्रेस-राजद यांच्या महागठबंधनला बिहारची जनता यावेळी संधी देणार? जनतेच्या मनात नेमकं काय? हे कळणार आहे. 243 जागांसाठी ही निवडणूक पार पडली असून 122 हा बहुमताचा आकडा आहे. बिहारमध्ये 1951 नंतर पहिल्यांदाच यंदा मतदानाचं प्रमाण वाढलं असून दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 67 टक्के मतदान पार पडलं आहे. त्यामुळं या वाढलेल्या मतदारांचा कौल कोणत्या आघाडीला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दाखवत असलं तरी काही पोलमधून तेजस्वी यादव यांचा आरजेडी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुख्यमंत्रीपदासाठी देखील तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्याला पसंती असल्याचं एक्झिट पोलचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com