अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकतात तेव्हा...

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आज विधानसभेच्या अध्यक्षांवर भडकले.
Nitish Kumar
Nitish Kumar Sarkarnama

पाटणा : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे आज थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकले. सभागृहात सर्वांसमोर नितीश यांनी अध्यक्षांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून दिली. विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा हे भाजपचे (BJP) आहेत. नितीश हे अध्यक्षांना झापत असताना भाजपचे मंत्री व आमदार मात्र, शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत बसून होते. यामुळे सत्ताधारी संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपमधील दरी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष सिन्हा यांचा मतदारसंघ लखीसराय आहे. त्यांच्या मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांमध्ये नऊ जणांची हत्या झाली आहे. या प्रकरणावर आज सभागृहात मंत्री बिजेंद्र यादव उत्तर देत होते. या वेळी सभागृहाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नितीशकुमार संतापले. ते अध्यक्षांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही ज्या पद्धतीने कामकाज हाताळत आहात, ते मला पटलेले नाही. सभागृहात घटनेनुसार कामकाज अपेक्षित असते. परंपरांकडे काणाडोळा केला जाताना दिसत आहे.

Nitish Kumar
विरोधकांना धक्का! पाच आमदारांना निलंबित केलं अन् थेट उचलून सभागृहाबाहेर काढलं

नितीशकुमार यांचा संताप पाहून अध्यक्षांसह भाजपचे आमदारही गप्पगार पडले. ते शांतपणे संतप्त नितीशकुमारांचे बोलणे ऐकत होते. लखीसरायमध्ये गेल्या काही दिवसांत नऊ जणांची हत्‍या झाल्याप्रकरणी मंत्र्यांच्या उत्तरावर भाजपचे आमदार संजय सरावगी यांनी पुरवणी प्रश्‍नोत्तराच्या वेळी प्रश्न उपस्थित केले. यातील काही घटनांमध्ये आरोपींना अद्याप पकडण्यात आलेले नाही. यावर विजयकुमार सिन्हा यांनी मंत्र्यांना मुदत देत 16 मार्चला पुन्हा उत्तर देण्याची सूचना केली. अध्यक्षांच्या या कामकाजाच्या पद्धतीवर नितीशकुमार संतप्त झाले. त्यांनी थेट सभागृहात येऊन अध्यक्षांना धारेवर धरले. त्यांचा राग अनावर झालेला पाहून सभागृहातील सत्ताधारी व विरोधकही हैराण झाले.

Nitish Kumar
तुम्ही व्हीआयपी नाही! शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांना न्यायालयानं सुनावलं

अध्यक्ष त्यांच्या क्षेत्रातील घटनांवर अशा पद्धतीने मंत्र्यांना पुन्हा जवाब देण्यास उत्तरदायी ठरवू शकत नाही, अशी भूमिका नितीश कुमार यांनी शेवटी मांडली. नितीश कुमार यांच्या राग शांत झाल्यानंतर दहा मिनिटांनी अध्यक्षांनी त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आठवण करून दिली. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवला नाही, तर लोकशाहीची मुळे कमजोर होतील, असे वाजपेयी म्हणत असल्याचे सिन्हा यांनी स्मरण करुन दिले. सभागृहात मुख्यमंत्री विरोधी अध्यक्ष असे चित्र आज दिसले. त्याची पुनरावृत्ती आगामी काळात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com