
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. त्यासाठी राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. महाआघाडी आणि एनडीए यांच्यात थेट लढत होत असताना आता चंद्रशेखर आझाद यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांचा पक्ष बिहारमध्येही निवडणूक लढवणार आहे. 40 जागा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
बिहारच्या राजकारणात नितीश आणि तेजस्वी यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरू असताना दुसरीकडे चंद्रशेखर यांनी ४० जागांसाठी विधानसभा मतदारसंघ प्रभारींची यादी जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.
चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्षाने (कांशीराम) बिहारमधील विधानसभेच्या ४० जागांसाठी प्रभारी जाहीर केले आहेत. आझाद समाज पक्षाने सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर प्रभारींची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. या 40 प्रभारींपैकी 10 जण मुस्लीम आहेत. अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याची चंद्रशेखर आझाद यांची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नरकटियागंज येथील मुख्तार मियाँ, सिक्ताचे मोनिउद्दीन आलम, केसरियाचे विनय पासवान, पिपराचे मुमताज आलम, कुर्धानीचे रवी कृष्णा, साहेबगंजचे सरफुद्दीन मोहम्मद कासिम, मुझफ्फरपूरचे शानू कुमार, कांतीचे इफ्तेखार ताबिश, साक्रा येथील समता प्रकाश भारती, राजपाकडचे डॉ. बिंदेश्वर राम आणि महुआ चे शनी कुमार यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.
याशिवाय कारगहरचे राम प्रसाद, हाजीपूरचे शशी स्वराज, बगहाचे महफूज आलम, फुलवारीचे नरेंद्र कुमार, मसौढीचे कुमार केशवचंद्र, आरा चे प्रदीप कुमार, जगदीशपूरचे सुरेश सिंह, शहापूरचे कृष्णा राम, चेनारीचे अमित पासवान, सासारामचे शहजाद हुसेन, मोहनियाचे शशिकांत कुमार आणि चैनपूरचे अक्षय कुमार सिंह यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजोलीतून हिरा रविदास, हिसुआ मधून धर्मेंद्र राजवंशी, रामगढमधून हिसामुद्दीन अन्सारी, कुटुंभामधून नवीन कुमार, गोहमधून नागेश्वर प्रसाद,सिकंदरा मधून नंदलाल कुमार, चाकईतून प्रकाश कुमार, त्रिवेणीगंजमधून संतोष कुमार, सिंहेश्वरमधून बिट्टू कुमार राम, पूर्णियामधून विक्रम राज, मो. इश्तियाक आलम यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
किशनगंजमधून वसीम अक्रम, कोढा येथून आशिष कुमार, कल्याणपूरमधून वीरेंद्र कुमार राम, मोरवा येथून बैदनाथ साहनी, साहेबपूरमधून राम प्रवेश कुमार आणि तरैया येथून राजेंद्र रोशन यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.