Bihar Election 2025: "कोणी दारु प्यायला नेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करु नये"; केंद्रीय मंत्र्याची अजब मागणी

Bihar Election 2025: या विधानामुळं या मंत्र्याची सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मीडियात युजर्सनं यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 Nitish Kumar
Nitish Kumarsarkarnama
Published on
Updated on

Bihar Election 2025: मद्यपान करणाऱ्यांबाबत एका केंद्रीय मंत्र्यानं केलेलं विधान सध्या चर्चेत आहेत. जर कोणी दारु प्यायला घेऊन जात असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करता कामा नये, असं विधान या मंत्र्यानं केलं आहे. या विधानामुळं या मंत्र्याची सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मीडियात युजर्सनं यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 Nitish Kumar
Top 10 News: शिवाजी महाराजांचं नाव बदलून मेट्रो स्टेशनला ‘सेंट मेरी’ नाव ते 15 कोटींचा भाव! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार?

बिहारमध्ये मद्यबंदी लागू आहे. याच वर्षाच्या शेवटी इथं विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यातच बिहारमधले अनेक विरोधी पक्ष बिहारमधील मद्यबंदी उठवावी अशी मागणी करायला लागले आहेत. याचं कारण सांगताना ते सांगतात की, या नियमामुळं गरीब आणि निर्दोष लोक भरडले जात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री जितनराम मांझी यांनी एक अजब विधान केलं आहे.

 Nitish Kumar
VP Election 2025: 15 कोटींचा भाव! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार? तृणमूलच्या खासदाराचा भाजपवर गंभीर आरोप

मांझी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, जर कोणी दारु घेऊन जात असेल तर त्याला पकडलं जाऊ नये, पण पोलीस त्याला काहीही केलं तरी पकडून घेऊन जातात. जे लोक हजारो-लाखो लिटर दारु तयार करत आहेत, दारुची चोरी करत आहेत, तस्करी करत आहेत अशा लोकांना पकडण्यासाठी खरंतर विशेष मोहिम चालवायला पाहिजे. अशा लोकांना पोलिसांनी अटक केली पाहिजे.

मांझी पुढे म्हणतात, नितीश कुमार यांनी दारुबंदीबाबतच्या तिसऱ्या आढावा बैठकीत म्हटलं होतं की, जर कोणी थोड्या प्रमाणात पिण्यासाठी घेऊन जात असेल तर त्याला पोलिसांनी पकडू नये. पण जर याप्रकरणात कोणाला अटक झाली असेल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर नितीश कुमार यांनी अशा लोकांवरील गुन्हे निवडणुका होण्यापूर्वीच हटवायला हव्यात. तसंच त्यांना माफ करायला हवं.

पोलिसांवर साधला निशाणा

जितनराम मांझी असंही म्हणतात की, आढावा बैठकीत ही बाब मांडण्यात आली की जर कोणी दारु पिऊन येत असेल किंवा पिण्यासाठी जात असेल तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेता कामा नये. तसंच त्याला तरुंगातही पाठवता कामा नये. पण हे पोलिसांचं तंत्र आहे. पोलीस लोक आपलं पाप लपवण्यासाठी मोठ-मोठ्या तस्करांना सोडून देतात आणि गरीबांना पकडून तुरुंगात धाडतात. पोलीस केवळ कायदेशीर कारवाई करुन आपला कोटा पूर्ण करु इच्छितात. ही गोष्ट नितीशकुमार यांनी समजून घेतली पाहिजे. पण जर कोणावर कारवाई झालीच असेल तर निवडणुकीपूर्वीच ती मागे घ्यायला हवी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com