Nitish kumar : नितीश कुमारांचा मोठा निर्णय, जेडीयूची कार्यकारिणी बरखास्त!

JDU Nitish kumar Dismissed state committee :जेडीयूच्या नवीन कार्यकारिणीमध्ये 10 उपाध्यक्ष, 49 सरचिटणीस, 46 सचिव, 9 प्रवक्ते आणि एक खजिनदार यांचा समावेश आहे.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Nitish kumar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एका वर्षापूर्वी नितीश कुमारांनी आपला पक्ष जनता दल युनायडेट (जेडीयू) ची जम्बो राज्य कार्यकारिणी जाहीर केली होती. या कार्यकारिणीमध्ये तब्बल 260 सदस्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, आज (शनिवारी) नितीश कुमार यांनी ही राज्य कार्यकारिणी बरखास्त केली आहे.

नितीश कुमार यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली असून तब्बल जुन्या कार्यकारिणीतील 185 सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये 10 उपाध्यक्ष असणार आहे.

जेडीयूच्या नवीन कार्यकारिणीमध्ये 10 उपाध्यक्ष, 49 सरचिटणीस, 46 सचिव, 9 प्रवक्ते आणि एक खजिनदार यांचा समावेश आहे. जुनी कार्यकारिणी बरखास्त करताना राजकीय नेत्यांना सल्ला देण्यासाठी निर्माण करण्यात आलेली सल्लागार समिती देखील विसर्जित करण्यात आली आहे.

Nitish Kumar
Ambadas Danve : मुख्यमंत्र्यांना विसर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलावली बैठक..

23 मार्च 2023 रोजी जेडीयूने 251 सदस्यांसह एक राज्य समिती स्थापन केली होती. त्यात 20 उपाध्यक्ष, 105 सरचिटणीस, 114 सचिव आणि 11 प्रवक्ते यांचा समावेश होता. नंतर आणखी काही पदाधिकारी जोडले गेले त्यामुळे या कार्यकारिणीच संख्या 260 झाली होती. राज्य कार्यकारिणीचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो पण अवघ्या 15 महिन्यांनंतर ही कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली.

आज (शनिवारी) सकाळी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला. कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस 100 होतो त्यांची संख्या 50 वर आणण्यात आली आहे. कार्यकारिणी बरखास्त करण्याचे कारण समोर आले नाही.

Nitish Kumar
BJP Vs MVA : घाणेरड्या राजकारणाचं फळ भोगावं लागणार; भाजप नेत्यानं 'मविआ'ला घेतलं अंगावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com