Bihar Politics : एनडीए-'INDIA'च्या बैठकांपासून अलिप्त असलेल्या VIP ची नवी रणनीती

Bihar Politics : बिहारमध्ये व्हिआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी हे कुठलाही गटात सहभागी झालेले नाहीत.
Bihar Politics
Bihar Politics Sarkarnama
Published on
Updated on

INDIA vs NDA in 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए आणि विरोधीपक्षानी जोरदार तयारी केली आहे. विरोधीपक्षाची एकजुट करुन मोदी सरकारला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधीपक्ष प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपही बैठका घेऊन आपल्या मित्रपक्षाची ताकद किती आहे, याचा अंदाज घेत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विरोधक एकत्र येत असताना एनडीएने चार प्रमुख पक्षाना आपल्या सोबत घेतले आहे. अशा परिस्थितीत नितीशकुमारांच्या बिहारमध्ये व्हिआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश सहनी हे कुठलाही गटात सहभागी झालेले नाहीत.

Bihar Politics
Jayant Patil ON NCP rebels : राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या निलंबनावर जयंत पाटील काहीच का बोलत नाहीत ?

NDA आणि 'INDIA'च्या बैठकीपासून अलिप्त असलेले VIP चे सुप्रीमो मुकेश सहनी हे आपली वेगळी रणनीती तयार करीत आहेत. आपल्या "विकासशील इंसान पार्टी' ( VIP) कडून बिहारमध्ये आरक्षण यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा सहनी यांनी केली आहे. शंभर दिवस ही यात्रा सुरु राहणार आहे. प्रत्येक घरात व्हीआयपीची विचारधारा पोहचविण्यात येणार आहे. चार नोव्हेंबरपर्यंत ही रोजी ही यात्रा संपणार आहे. आरक्षण यात्रा ही तीन प्रदेशातील ८० जिल्ह्यातून जाणार आहे.आम्ही एनडीए किंवा "इंडिया" मध्ये सहभागी होणार नाही,असे मुकेश सहनी यांनी स्पष्ट केली आहे.

दिल्ली, बंगालमध्ये निषाद समाजाला आरक्षण मिळत आहे. या आरक्षणाप्रमाणेच बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथील या समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण मिळाले नाही, तर आम्ही कुठल्याही पक्षाची युती करणार नाही, असे मुकेश सहनी यांनी नमूद केले. नीतीश कुमार, तेजस्वी यादव, अमित शाह यांच्यासोबत आमचे मैत्रीपूर्ण संबध आहे, पण आम्ही कोणत्याही गटात सहभागी होणार नाही, असे ते म्हणाले.

Bihar Politics
Ratan Tata Maharashtra Udyog Ratna Award : रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' जाहीर

"पाच वर्षापासून आम्ही निषाद विकास संघाच्या माध्यमातून बिहारमध्ये काम करीत आहोत. २०१८ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यावर २०२०च्या निवडणुकीत व्हिआयपीच्या पाठिंब्यावर बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर आमच्या आमदारांनी कुणी फोडले, मंत्रीपदावरुन कुणी हटवले हे सगळ्यांना माहित आहे. निषाद समाजाला आरक्षण जो देणार त्याला पक्षासोबत आम्ही जाणार," असे सहनी यांनी सांगितले. बिहारमध्ये मुकेश सहनी हे एकीकडे स्वतःची ताकद अजमावत आहे, तर दुसरकडे महायुतीत सहभागी होण्यासाठीही इच्छुक असल्याचे दिसते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com