जिल्हा परिषदेपाठोपाठ पालिका निवडणुकीतही भाजप अन् काँग्रेसला झटका

जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळवल्यानंतर ओडिशामध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाने महापालिका व नगरपालिका निवडणुकीतही विरोधकांना धूळ चारली आहे.
Local Body Elections
Local Body Electionssarkarnama
Published on
Updated on

भुवनेश्वर : जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळवल्यानंतर ओडिशामध्ये (Odisha) सत्ताधारी बिजू जनता दलाने (BJD) महापालिका व नगरपालिका निवडणुकीतही विरोधकांना धूळ चारली आहे. राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आता तीन महापालिका आणि 76 नगरपालिका जिंकत भाजप व काँग्रेसला (Congress) पुन्हा झटका दिला आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात बीजेडीने सर्व 30 जिल्हा परिषदा जिंकत विरोधकांचा सुफडा साफ केला. त्यानंत शनिवारी तीन महापालिका व 108 नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये तीनही महापालिकांवर कब्जा केला. तर 76 नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली. भाजपला (BJP) केवळ 16 आणि काँग्रेसला सात नगरपालिकांमध्येच यश मिळाले. विशेष म्हणजे अपक्षंनी नऊ नगरपालिकांवर झेंडा फडकावला आहे. (Local Body Elections)

Local Body Elections
IT Raid: यशवंत जाधवांनी दिले 'मातोश्री'ला दिले दोन कोटी अन् ५० लाखांचे घड्याळ

भूवनेश्वरमध्ये पहिल्यांदाच महिला महापौर

बीजेडीच्या सुलोचना दास (Sulochana Das) या (Odisha) भुवनेश्वर महापालिकेच्या (Bhubaneswar Municipal Corporation) महापैारपदाच्य निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्या भुवनेश्वरच्या पहिल्या महिला महापैार ( first woman mayor) ठरल्या आहेत. दास यांना १ लाख ७४ हजार मते मिळाली आहेत. त्यांचा ६१ हजारापेक्षा अधिक मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या सुनिती मुंड यांचा पराभव केला.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाटक यांनी सुलोचना दास यांचे अभिनंदन केले आहे. या विजयाविषयी बोलताना दास म्हणाल्या, ''मला ही संधी दिल्याबद्दल मी भुवनेश्वरच्या जनतेचे आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची मी आभारी आहे. भुवनेश्वरला स्मार्ट सिटी करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.'' दास या बीजेडीमध्ये येण्यापूर्वी प्रदेश कॉग्रेसच्या प्रवक्ता होत्या.

Local Body Elections
ऐन उन्हाळ्यात जनतेची होरपळ! पेट्रोल, डिझेल 6 दिवसांत 5 वेळा महागलं

जिल्हा परिषदेतही महिलाराज

राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये बीजेडीची सत्ता आली असून 21 परिषदांमध्ये महिला अध्यक्ष बनल्या आहेत. महिला आरक्षण नसलेल्या ठिकाणीही पक्षानं महिलांना संधी दिली आहे. बीजेडीने 30 पैकी 60 ते 70 टक्के जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी घटकांतील विजयी उमेदवारांना अध्यक्षपद दिलं आहे. त्यातही सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. तसेच या अध्यक्षांचे सरासरी वयही 41 एवढे आहे. सरस्वर्ती माझी या सर्वात तरूण अध्यक्ष ठरल्या आहेत. त्या 23 वर्षांच्या असून बीएसस्सी पदवी संपादन केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये विकासकामांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. (Election News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com