Mamta Mohanta : राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर अवघ्या 24 तासांतच 'BJD'च्या ममता मोहंता 'BJP'मध्ये दाखल!

Mamta Mohanta Join BJP : मोहंता यांनी दिलेल्या राज्यसभा सदस्यत्वाच्या राजीनाम्याकडे भाजपची राजकीय खेळी म्हणून बघितले जात आहे.
Mamta Mohanta
Mamta MohantaSarkarnama
Published on
Updated on

Mamata Mohanta : ओडिशामधील माजी राज्यसभा खासदार ममता मोहंता यांनी बीजू जनता दल आणि राज्यसभेतून राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे ओडिशामधील कुडुमी समुदायाच्या एक नावाजलेल्या नेत्या ममता मोहंता यांनी आपला राज्यसभेचा कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्षे आधीच राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याकडे भाजपची राजकीय खेळी म्हणून बघितले जात आहे.

कारण, ममता मोहंता(Mamata Mohanta) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी तो तत्काळ मंजूर केला होता. मला आज(बुधवारी) ओडिशा राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य ममता मोहंता यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालं आहे. ज्यामध्ये त्यांनी राज्यसभेतील त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र लिहून राजीनामा दिला आहे. मी ते संविधानिकदृष्ट्या पडताळून बघितले आणि त्यांचा राजीनामा मान्य केला आहे. असं धनखड यांनी म्हटलं होतं.

Mamta Mohanta
BJP Politics In Odisha : ओडिशामध्ये सुरू झाला 'खेला'? ; भाजपचा नवा गड राज्यसभेत सेट करणार नंबर गेम!

मोहंता 2020मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता. परंतु त्यांनी दोन वर्ष आधीच राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचा थेट भाजपला(BJP) फायदा होणार आहे. ममता मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता पोटनिवडणूक होईल.

तर विधानसभेतील सदस्य संख्येच्या गणितानुसार ही जागा भाजपच्या हातात जाईल. ओडिशा मधून एकूण दहा राज्यसभा खासदार आहेत. राज्याची सत्ता भलेही भाजपच्या ताब्यात असेल, मात्र ओडिशामधून भाजपच्या खात्यात आता केवळ एकच राज्यसभा खासदार आहे, उर्वरीत जागांवर बीजू जनता दलाच्या(BJD) नेत्यांचा ताबा आहे. मात्र आता जी निवडणूक होईल त्यात संख्याबळाच्या आधारावर भाजपकडून अनेक खासदरांना ओडिशामधून राज्यसभेवर पाठवले जावू शकते.

Mamta Mohanta
Congress Screening Committee : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रिनिंग कमिटी जाहीर; मधुसूदन मिस्त्री अध्यक्ष!

48 वर्षीय ममता मोहंता या मार्च 2020 मध्ये बीजू जनता दलाच्या राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या. त्या 2020 मध्ये ओडिशाच्या चार जागांपैकी त्यांच्या जागेवरून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता बीजेडीचे राज्यसभेत आठ सदस्य आहेत.

भाजपमध्ये दाखल झालेल्या ममता म्हणाल्या की, मी कोणत्याही षडयंत्रामुळे भाजपमध्ये प्रवेश केला नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या आदर्शांनी प्रेरीत आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने लोकांची सेवा करतात ते मला प्रेरणा देते. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com