Odisha CM Oath Ceremony : नवीनबाबूंच्या स्वागतासाठी शाहांनी खुर्ची सोडली; गडकरींसह चार केंद्रीय मंत्री उभे...

Naveen Patnaik Odisha CM Mohan Charan Majhi Amit Shah : शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मोहन माझी यांनी सकाळीच नवीन पटनायक यांना घरी जाऊन निमंत्रित केले होते.
Amit Shah, Naveen Patnaik, Dharmendra Pradhan
Amit Shah, Naveen Patnaik, Dharmendra PradhanSarkarnama

Odisha : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह व भाजपच्या सर्वच नेत्यांनी ओडिशाचे मावळते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर जोरदार प्रहार केले होते. बुधवारी तेच नेते पटनायक यांच्या स्वागतासाठी धडपडत असल्याचे पाहायला मिळाले.

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचा बुधवारी शपथविधी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि पटनायकही उपस्थित होते. शपथविधीसाठी माझी यांनी सकाळीच पटनायक यांच्या घरी जाऊन त्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे पटनायक येणार की नाही, याबाबत उत्सुकता होती.

Amit Shah, Naveen Patnaik, Dharmendra Pradhan
Uttar Pradesh Assembly Election : अखिलेश यांचा आमदारकीचा राजीनामा; लोकसभेनंतर ‘यूपी’त विधानसभेचे पडघम

शपथविधी सुरू होण्यास काही मिनिटांचा कालावधी असताना पटनायक व्यासपीठावर दाखल झाले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वांसमोर घेऊन आले. पटनायक येत असल्याचे पाहून अमित शाह आपली खुर्ची सोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले. हस्तांदोलन केल्यानंतर शाहांनी त्यांना त्यांच्या खुर्चीकडे बोट दाखवत नेले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व इतर नेत्यांनीही उभे राहत त्यांचे स्वागत गेले. त्यांच्यात काही सेकंदांचा संवादही झाला. हा दुर्मिळ क्षण अनेकांनी कॅमेरात टिपला. मागील  वर्षांनंतर पटनायक यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनीही त्यांचा मान राखत व्यासपीठावर स्थान दिले.

Amit Shah, Naveen Patnaik, Dharmendra Pradhan
Amit Shah : शाहांनी शपथविधीच्या स्टेजवरच महिला नेत्याला फटकारलं; भाजप नेत्यांमध्ये वादाचा भडका

पंतप्रधानांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांनीही पटनायक यांच्याशी काहीवेळ संवाद साधला. दरम्यान, राज्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत 147 पैकी 78 जागा मिळाल्या आहेत. तर बिजू जनता दलाला केवळ 51 जागांवर समाधान मानावे लागले. काँघ्रेसला 14 आणिडाव्या पक्षांना केवळ एक जागा मिळाला. तर तीन अपक्षही निवडून आले आहेत.

प्रचारादरम्यान मोदींनी पटनायक यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच जगन्नाथ मंदिरातील खजिन्यावरून नवीनबाबूंवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये भाजपने बाजी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com