SC ST reservation Sub categories : सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी आरक्षणात वर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत. तसेच हे आरक्षण देताना क्रिमिलेअर बाबत राज्यांनीच धोरण निश्चित करून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय दिला आहे.
या आरक्षणातील क्रिमिलेअरच्या मुद्द्यावरून भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजपच्या 100 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. खासदारांच्या चिंतेनंतर मोदींनीही तोडगा त्यांना मार्ग काढण्याबाबत आश्वासित केले आहे.
पंतप्रधान मोदींची Narendra Modi भेट घेतल्यानंतर भाजपचे खासदार सिकंदरकुमार आमच्या मागणीवर पंतप्रधान सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअरबाबत नोंदवलेल्या निरीक्षणामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. त्याबाबत असंख्य लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. मात्र त्यांना काय उत्तर द्यावे, हेच समजत नाही.
यातून मार्ग काढण्यासाठी भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. विषय समजावून घेतल्यानंतर त्यांनी आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द दिल्याचेही सिकंदरकुमार यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर केंद्रीयमंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने (रामविलास) चिंता व्यक्त केली होती. याविरोधात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचेही पक्षाच्या वतीने जाहीर केलेले आहे.
न्यायालयाने एससी-एसटीच्या आरक्षणाबाबत क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी होता कामा नये, अशी आमची भावना असल्याचे भाजप खासदार फग्गनसिंह कुलस्ते यांनी मांडली. तसेच खासदारांची मत आहे तीच भावना पंतप्रधानांचीही आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला काळजी करू नका. एससी-एसटींसाठी क्रिमिलेअर लागू होणार नाही, असे स्पष्टच सांगितले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.