Rahul Gandhi vs Savarkar : राहुल गांधींच्या विरोधात शिंदे गट आक्रमक, दुसरी तक्रार दाखल

Rahul Gandhi vs Savarkar : राहुल यांच्या विरोधात भाजप-मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi vs Savarkar : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या शेगाव येथे आहे. या यात्रेत त्यांनी सावरकरांबद्दल केलेली सावरकरांबाबत केलेल्या विधानाची चर्चा आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी-सावरकर वाद आता विकोला गेला आहे. राहुल यांच्या विरोधात भाजप-मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काल (शुक्रवारी) ठाण्यात पोलिस तक्रार दाखल केली आहे. आज राहुल गांधी यांच्याविरोधात आज दुसरी तक्रार ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे राहुल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भाजपतर्फे आजही निषेध करण्यात आला. मुंबईत ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यात येत आहेत दहिसर विधानसभा मतदारसंघातही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. राहुल गांधी यांच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलिस स्थानकात ही तक्रार दिली आहे.

Rahul Gandhi
MNS : 'खळखट्याक' सुरु ; Rahul Gandhi यांची सभा उधळण्यासाठी आलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

राहुल गांधी यांच्या या भूमिकेच्या विरोधात राज्यात पडसाद उमटत आहेत. नाशिक, ठाणे, पुणे हे आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारत जोडो यात्रे दरम्यान आज (शुक्रवारी) शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होत आहे, या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल (शुक्रवारी) दिला आहे. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलने 'खळखट्याक'होण्यास सुरवात झाली आहे. मनसैनिकांनीही आज मोठ्या संख्येने शेगावात दाखल होत आहेत. "शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा," असे राज ठाकरे म्हणाले होते.

शेगाव येत असलेले मनसेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी चिखली (बुलढाणा) येथे अडवले. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरवात केली आहे. नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, संदीप देशपांडेसह अनेक मनसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'नोटिस न देता आमच्यावर कारवाई केली,' असे मनसे नेत्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com