Nanded News : भाजपचे दिवंगत नेते, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी "अमित शाह माझे नेते आहेत. मी लवकरच त्यांना भेटून माझं म्हणणं मांडणार आहे," असे म्हटलं होते. भाजपचे नेते, केद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत.
आज सांयकाळी शाह यांची जाहीर सभा आहे. या सभेच्या निमित्ताने पंकजा मुंडे या अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने त्यांच्याकडे मुंडे आपलं काय म्हणणं मांडणार, याकडे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहेत.
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भाजपने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रातही 30 जूनपर्यंत भाजपने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजपची नांदेडमध्ये सभा होत आहे. या सभेला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडेही या सभेला संबोधित करणार आहेत.
काही दिवसापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. "मी भाजपची आहे. भाजप माझा पक्ष थोडीच आहे," असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी घुमजावही केलं होतं. मी तसं म्हणालेच नाही, माझ्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचा दावा केला होता.या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात अमित शाह माझे नेते आहेत. मी लवकरच त्यांना भेटून माझं म्हणणं मांडणार असल्याचं म्हटलं होतं.आज पंकजा मुंडे आणि अमित शाह हे एकाच मंचावर येणार आहेत. शाह यांच्या समोरच जाहीरसभेतून मुंडे काय भाष्य करणार? याकडे सर्वांचं सगळ्याचे लक्ष लागलं आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.