Nagaland Election : नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. नागालँडमध्ये भाजपसोबत एनडीपीपीची युती आहे. आज भाजपने आपले सर्व २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इम्रा अलॅान्ग यांना भाजपने निवडणुक रिंगणात उतरवले आहे. ते अलोंगट विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. तेमजेन इम्रा अलॅान्ग म्हणाले, "नागालॅंडच्या ६० जागापैकी २० जागा भाजप लढवत आहे, तर ४० जागा एनडीपीपी लढविणार आहे.
नागालॅंड आणि मेघालय येथे २७ तारखेला मतदान होणार आहे. त्रिपुरा येथे १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. निकाल २ मार्च रोजी होणार आहे.
मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाने ६० जागासाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत या ६० नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मेघालय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक काळात मेघालयामध्ये मोदींच्या सभा, रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी मेघालयात मोदींच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता भाजपच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.
मेघालय विधानसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने सर्वच आघाड्यावर जोर लावला आहे. सध्या मेघालय विधानसभेत भाजपचे दोनच आमदार आहेत. येथे विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत असून ३ मार्च रोजी निकाल आहे.