भाजपने 6300 कोटी खर्च करून 277 आमदार खरेदी केले; केजरीवालांचा गंभीर आरोप

मArvind Kejriwal : सीबीआयने 14 तास छापे टाकले, घरातील गादी-उशी फाडल्या मात्र त्यांच्या हाती एक रुपयाही लागला नाही.
arvind-kejriwal-and-modi Latest News
arvind-kejriwal-and-modi Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आम आदमी पक्षातील वाद चांगलाच चिघळतांना दिसत आहे. भाजप आणि 'आप'चे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना आज (ता.२६ ऑगस्ट) 'आप'चे (AAP)राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.

भाजपचा दिल्लीतील सरकार पाडण्याचा डाव फसला आहे. बाबासाहेब झिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, अशा घोषणाही केजरीवाल यांनी यावेळी दिल्या. तसेच भाजपने 6300 कोटी रुपयांमध्ये 277 आमदार खरेदी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. (Arvind-kejriwaland BJP Latest News)

arvind-kejriwal-and-modi Latest News
गुलाब नबी आझादांची पुढील राजकीय वाटचाल ठरली..केली मोठी घोषणा...

केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील शाळांचे अमेरिकेतही कौतुक झाले आहे. बाहेरचे लोक दिल्लीत आल्यावर शाळा बघतात. तसेत दिल्लीत केलेल्या कामाची पाहणी केला जाते त्याबरोबर या कामाची जगभर चर्चा आहे. देशात जर कुणी शिक्षणमंत्री असेल तर ते सिसोदिया आहेत. मात्र अशा स्थितीत त्यांच्यावर दारू घोटाळ्याचे खोटे आरोप करण्यात आले आहे.

'आप'च्या आमदारांनाही भाजपकडून खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भाजपने आतापर्यंत 277 आमदारांना सुमारे 6300 कोटी रुपये खर्च करून विकत घेतल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

arvind-kejriwal-and-modi Latest News
आम्हाला बोलू देत नाहीत; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा संभाजीराजेवर गंभीर आरोप

दरम्यान, केजरीवाल म्हणाले की, 'मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयने 14 तास छापे टाकले, घरातील गादी-उशी फाडल्या मात्र त्यांच्या हाती एक रुपयाही लागला नाही. छापा टाकण्यासाठी 30-35 लोक आले होते. मात्र छाप्यात त्यांच्या खाण्याचे पैसेही निघाले नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.

सीबीआयच्या छाप्याला आठ दिवस झाले असून सिसोदियांच्या घरातून अद्याप काय मिळाले याबाबत काहीही माहिती नाही. हा संपूर्ण बनावट छापा होता, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवाल यांनी केलेल्या आरोपावरून राज्यातील विरोधकांनीही भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला जात असून आज शिवसेनेच्या मुखपत्रातूनही यावरून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com