Nirmala Sitaraman Budget 2023 : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) आज (बुधवार) अर्थसंकल्प (Union Budget 2023 )सादर करणार आहेत. यासाठीचं संसदेचे अर्थसंकल्प 2023 यंदाच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाला अनेक अपेक्षा आहेत.
मोदी सरकारकडून किमान यंदाच्या वर्षी करामध्ये सवलत मिळण्याच्या अपेक्षा सध्या वेतनश्रेणीमध्ये येणाऱ्या वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
अर्थसंकल्पातील मुद्दे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपने एक अभियान हाती घेतली आहे. आजपासून १२ तारखेपर्यंत भाजपचे प्रमुख केंद्रीय मंत्री ५० मोठ्या शरहार पत्रकार परिषद घेणार आहेत, असे अभियान पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. मोदी सरकारने २०२४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बजेटपासून प्रचारास सुरवात करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पाच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे. भाजप शासित राज्यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अर्थसंकल्पातील खास मुद्दे, विषय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आयोजित परिसंवादत सहभाग घेणार आहेत.
जे.पी. नड्डा यांची यासाठी केलेल्या समितीचे अध्यक्ष सुशील मोदी आहेत. हे अभियान १२ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याठिकाणी भाजपचे वरिष्ठ नेते या अभियानात सहभागी होणार आहेत.
आज निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच भाजपच्या प्रवक्त्यांची बैठक होणार आहे. यात अर्थसंकल्पातील खास मुद्दांवर चर्चा होणार आहेत. त्यानंतर या अभियानाला सुरवात होणार आहे. आज ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सितारमण बजेट सादर करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.