PM Modi : नेमके झाले तरी काय ? मोदींनी पहाटे 3 वाजता पक्ष कार्यालय सोडले !

BJP Headquarter : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रिय निवडणुक समितीची बैठक गुरुवारी रात्री सुरु झाली तर ती शुक्रवार पहाटे पर्यंत चालली. 16 राज्यांच्या नेत्यांसोबत तब्बल चार तास ही बैठक झाली. शंभर जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर सर्व नेते मंडळी रवाना झाले. लोकसभा निवडणुक जवळ येत असताना इतक्या पहाटे पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे संघटनेतील वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची उपस्थिती होती.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच 400 पार चा नारा दिल्यानंतर भाजप नेते कामाला लागले आहे. इतकेच नाही तर मध्यरात्रीतून महत्वाच्या मिटिंग, घडामोडी होत आहे. देशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी, त्याच बरोबर प्रत्येक राज्यात स्थानिक राजकीय पक्ष यांना टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. एप्रिल आणि मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या बैठका सुरु झाल्या आहे. नवी दिल्लीत पक्षाच्या केंद्रिय निवडणुक समितीची महत्वपुर्ण बैठक गुरुवारी रात्री सुरु झाली आणि ती शुक्रवारी पहाटे पर्यंत चाचलली. लोकसभा निवडणुकीत एक एक जागा जिंकणे व त्या दृष्टीने रणनिती आखणे यासाठीची ही महत्वाची बैठक होती. या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीतील नाव निश्चिती करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

BJP Central Election Committee meeting
BJP Central Election Committee meetingSarkarnama

लोकसभा निवडणुक जवळ आल्या आहेत. त्या दृष्टीने भाजप उमेदवार निश्चिती, स्थानिक पक्षांसोबत सीट शेअरींग, विविध राज्यातील भाजप सोबत युतीत असलेले पक्ष, त्यांच्या जागा वाटप आणि भाजप ची उमेदवारांची पहिली यादी निश्चित करण्यासाठी ही बैठक सुरु होती. गुरुवारी (29 फेब्रुवारी ) ला रात्री 10.30 वाजता भाजप पक्ष कार्यालयात या विषयीची बैठक सुरु झाली ती तब्बल चार तास चाचलली. शुक्रवारी (1मार्च) रोजी सकाळी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष कार्यालय सोडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Lok Sabha Election 2024 News : इच्छुकांची धाकधूक वाढली; लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी येणार; मोदी, शहांसह 'ही' नावे कन्फर्म ?

त्यानंतर अमित शाह, जेपी नड्डा यांनी पक्ष कार्यालय सोडले. या बैठकीला महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरात चे भुपेंद्र पटेल, राजस्थान चे मुख्यमंत्री भजन लाल, मध्यप्रदेश चे मोहन यादव, छत्तीसगड चे विष्णु देव साई, उत्तराखंड चे पुष्करसिंग धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रिय निवडणुक समितीचे सदस्य होते. सोळा राज्याचे प्रमुख नेते मंडळी या बैठकीला हजर होते.

पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह लोकसभेच्या शंभर उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. त्याची घोषणा लवकर भाजप करेल. त्यासाठी ही महत्वपुर्ण बैठक होती. या बैठकीत राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील काही जागांवर चर्चा झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ज्या जागांवर पराभूत झाले त्या जागांपैकी काही जागांवरचे उमेदवार या पहिल्या यादीत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात उत्तरप्रदेशातील 14 लोकसभा जागांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली जिथे भाजप ला गेल्या निवडणुकीत धक्का बसला होता. त्याच बरोबर पहिल्या यादीत जिथे भाजप ला सर्वाधिक फोकस करावे लागणार आहे अशा ४० जागांचे उमेदवार लवकरच घोषित करण्यात येतील. त्याच बरोबर राजस्थान, मध्य प्रदेशातील महत्वाच्या लोकसभा जागांवरील उमेदवारांची नावे जाहिर करण्यात येतील.

Narendra Modi
Kolhapur Lok Sabha Election 2024 : ठरलं! शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; कोणत्या चिन्हावर लढणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com