मुलाच्या तिकिटासाठी खासदारकीवर पाणी सोडण्याची तयारी दाखवूनही पक्षानं डावललं

मुलाला तिकीट मिळावे यासाठी खासदारकीवर पाणी सोडण्याची जाहीर तयारी दाखवली होती.
Rita Bahuguna Joshi and Mayank Joshi
Rita Bahuguna Joshi and Mayank Joshi Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी (UP Election 2022) भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांनी मोठी घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी मुलाला तिकीट मिळावे यासाठी जाहीरपणे खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यांनी मुलगा मयांक जोशी (Mayank Joshi) याच्यासाठी खासदारकीवर पाणी सोडण्याची तयारी केली होती. तरीही पक्षाने त्यांच्या मुलाचे तिकीट कापून जोशींना धक्का दिला आहे. यामुळे जोशी या नाराज झाल्याचे समजते.

उत्तर प्रदेशात भाजपमध्ये (BJP) तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत हेवेदावे सुरू आहेत. रीटा बहुगुणा जोशी यांनी पुन्हा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. मुलगा मयांक जोशीसाठी त्या खासदारकी सोडण्यास तयार होत्या. आज भाजपने लखनौमधील हायप्रोफाईल अशा नऊ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी बराच खल झाल्यानंतर जाहीर केली. मागील वेळी लखनौमधील नऊपैकी आठ मतदारसंघ भाजपने जिंकले होते. रिटा बहुगुणा जोशी यांचे पुत्र मयांक जोशी हे लखनौ कॅन्टोन्मेंटमधून इच्छुक होते. पण त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी विद्यमान मंत्री ब्रजेश पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत रिटा बहुगुणा जोशी यांनी तेथून विजय मिळवला होता. हा भाजपचा अतिशय सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. आता मयांक यांना तेथून उमेदवारी न देता भाजपने धक्का दिला आहे.

Rita Bahuguna Joshi and Mayank Joshi
भाजपकडून गाजावाजा करीत मुलायमसिंहांच्या सूनबाईंना प्रवेश पण ऐनवेळी पत्ता कट

काही दिवसांपूर्वी रिटा बहुगुणा जोशी पक्ष नेतृत्वाकडे मुलाच्या तिकिटासाठी जाहीर विनंती केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या मुलाने लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून तिकीट मागितले आहे. माझा मुलगा बारा वर्षांपासून राजकारणात आहे. अशा स्थितीत जर त्याने तिकीट मागितले तर तो त्याचा अधिकार आहे. एका कुटुंबात एकच पद अशी पक्षाची भूमिका असेल आणि जर पक्षाने माझ्या मुलाला तिकीट दिले तर मी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे.

Rita Bahuguna Joshi and Mayank Joshi
करोडोंचा चुना लावणारा विशाल फटे अन् त्याच्या कुटुंबीयांची मालमत्ता विकणार

उत्तर प्रदेशातील प्रचाराला जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व अन्य नेते विविध मार्गांनी राज्यात तुफानी प्रचार सुरू केला आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये काही भाजपच्या मंत्री व आमदारांनी भाजपला रामराम केल्यामुळे बरीच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराची मुख्य सूत्रे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी मोदी व शहांकडे गेली आहेत. भाजप तीनशेच्या वर जागा नक्की मिळवणार असा विश्वास पक्षाच्या दिल्ली वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com