भाजपकडून असाही गौरव; माजी मुख्यमंत्री ठरले 'सुपर कोरोना वॉरियर'!

भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोना संकट रोखण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.
BJP
BJPsarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. येडियुरप्पांच्या योगदानाचा आता भाजपने (BJP) अनोखा गौरव केला आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांना उत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले होते. आता त्यांना सुपर कोरोना वॉरियर पुरस्कार (Super Corona Warrior) देऊन सन्मानित केले जाणार आहे.

येडियुरप्पांचे निष्ठावंत आमदार एम.पी.रेणुकाचार्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात येडियुरप्पांना हा पुरस्कार देण्यात आला. येडियुरप्पांनी कोरोना संकट रोखण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी बोलताना रेणुकाचार्य म्हणाले की, मुख्यमंत्री असताना येडियुरप्पांना दोन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोणत्याही भीतीविना त्यांनी उपचार घेतले आणि ते बरे झाले. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असताना ते राज्यभरात दौरा करीत होते.

कोरोनाचा पहिली आणि दुसरी लाट थोपण्यासाठी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या येडियुरप्पांनी अनेक मोठी पावले उचलली. यातून महामारीला रोखण्यात यश आले, असेही रेणुकाचार्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात 5 हजार 200 कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यात आरोग्यसेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका आणि इतरांचा समावेश होता.

कर्नाटक विधानसभेने उत्कृष्ट आमदार पुरस्कार या वर्षीपासून सुरू केला आहे. या पुरस्काराचा पहिला मान येडियुरप्पांना मिळाला. राजकारणातील त्यांची प्रदीर्घ कारकिर्द आणि सभागृहातील उत्कृष्ट कामगिरी या आधारावर हा पुरस्कार देण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या सूचनेनुसार हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. ओम बिर्ला हे कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाला हजर होते.

BJP
आम्ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहत होतो! सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला सुनावलं

राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या येडियुरप्पांचा भाजपने उत्कृष्ट आमदार म्हणून गौरव केला होता. येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते 1983 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. ते लोकसभेवरही निवडून गेले होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे केवळ आमदार म्हणून काम करीत आहेत. त्यांच्यावर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

BJP
काँग्रेसपासून फारकत घेतलेले कॅप्टन अमरिंदरसिंग ठरणार भाजपची 'बी टीम'

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com