BJP on Congress Savarkar Tweet : काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे वादात सापडत आहेत. राहुल गांधींनी लंडन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानांवर भाजपाकडून परखड शब्दांत टीका करतानाच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक फोटो शेअर करत काँग्रेसनं केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होऊ होत आहे. त्यावर भाजप नेते संतापले आहे. राहुल गांधींना भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांच्या टि्वटमुळे कालपासून (रविवार) समाज माध्यमामध्ये नेटकऱ्यांचे शाब्दीक युद्ध सुरु आहे. या टि्वटवर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी सावरकरांसारख्या मोठ्या व्यक्तीमत्वाचा अपमान न करण्याचा काँग्रेसला सल्ला दिला आहे.
काल (रविवारी) राहुल गांधी यांच्या घरी चौकशीसाठी दिल्ली पोलीस आले होते. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. ३० जानेवारी रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधींनी लैंगिक शोषण झालेल्या महिलांविषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
"या यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, त्यापैकी काही महिलांनी मला सांगितलं की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्या महिलांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. ते या प्रकरणी कारवाई करतील. त्यावर त्या महिला मला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला फक्त तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल काही सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक त्रास सहन करावं लागेल”, असं राहुल गांधी म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काल केलेले टि्वट सध्या चर्चेत आहे. या टि्वटमध्ये काँग्रेसनं राहुल गांधींचा कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोबरोबर एका वाक्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करून ट्वीट करण्यात आलं आहे. यामध्ये “सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
किरेन रिजिजू यांनी काँग्रेसच्या त्या टि्वटचा स्क्रीनशॉट शेअर करीत टि्वट केले आहे. " मी तुम्हाला हाथ जोडून विनंती करतो, वीर सावरकरासारख्या महान व्यक्तीमत्वाचा अपमान करु नका," असे रिजिजू यांनी म्हटलं आहे.
रिजिजू यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. "एखाद्या माणसाच्या चारित्र्याची महानता त्याच व्यक्तीला समजेल ज्याला त्यागाची भावना समजते" असे रिजिजू यांनी म्हटलं आहे.
या व्हिडिओला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आवाज आहे. सावरकर कोण होते, याविषयी वाजपेयी यांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या या टि्वटला आत्तापर्यंत अनेकांची रिटि्वट केले आहे. नेटकरी उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेतही सलग पाच दिवस गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधींनी त्यांच्या विधानांबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपाकडून केली जात असताना काँग्रेसकडून त्यांच्या भूमिकांचं समर्थन केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.