पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly election 2022) भाजपकडून आज ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Frist list of bjp for goa election) करण्यात आली. भाजपची ही यादी काल म्हणजे १९ जानेवारीलाच जाहीर करण्यात येणार होती. मात्र काही जागांचा तिढा न सुटल्याने यादी येण्यास वेळ लागला होता. अखेरीस भाजपने आपल्या ३४ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, चंद्रकांत कवळेकर यांच्यासह इतर नावांची घोषणा केली आहे.
मात्र या यादीत भाजपची 'वन फॅमिली-वन तिकीट' ही घोषणा हवेतच विरली असल्याच पाहायला मिळत आहे. कारण याच यादीत भाजपने राणे दाम्पत्य आणि मोन्सेरात दाम्पत्याला तिकीट जाहीर केले आहे. यानुसार भाजपने वाळपई मतदारसंघातून विश्वजीत प्रतापसिंग राणे यांना तर पर्ये मतदारसंघातून त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचसोबतच पणजीतून बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) आणि ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घराणेशाहीचे समर्थन करत दिलेली उमेदवारी योग्यच असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विश्वजीत राणे हे यापुर्वीच भाजपचे आमदार होते. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देवून वाळपई मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर पर्ये हा मतदारसंघ काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे (Pratapsinh Rane) यांचा होता. आम्ही त्यांना काँग्रेसच्या उतरत्या आलेखाविषयी सांगून भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते.
मात्र प्रतापसिंग राणे यांनी आता वय झाले असल्याचे सांगून सक्रिय राजकारणापासून लांब राहणार असल्याचे घोषित केले आहे. त्यांच्या जागी त्यांनी हा मतदारसंघ भाजपला दिला असून त्याठिकाणी भाजपने राणे यांच्या इच्छेनुसारच दिव्या राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर मोन्सेरात दाम्पत्य यापुर्वी पासूनच विधानसभेवर होते. त्यामुळे दोघांनाही त्यांच्या सिटींग जागेवरूनच उमेदवारी देण्यात आली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.