भाजपने घेतला स्वामींचा धसका; तिकीट कापण्याचा विचार केलेल्यांनाही दिली उमेदवारी

UP Assembly Election : मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना पुन्हा तिकीट
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाचा (UP Assembly Election) गड राखण्यासाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची (BJP) ९१ जणांची तिसरी उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. यात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासह अनेक आमदारांनी भाजप सोडल्याने बसलेल्या झटक्यामुळे ज्यांची तिकीटे कापली जाण्याची चर्चा होती त्यांचीही नावे या यादीत आहेत.

दरम्यान लखनौसह भाजपसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या अनेक जागांवरील भाजप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. लखनौ कॅंट मतदारसंघातून आपल्या मुलाला तिकीट मिळावे यासाठी खासदार रीता बहुगुणा जोशी यांनी खासदारकीवरही पाणी सोडण्याची तयारी दाखविली आहे तर याच जागेसाठी आग्रही असलेल्या अखिलेश यादव यांच्या वहिनी अपर्णा यादव यांनाही भाजपने पक्षात घेतल्याने हा पेच आणखी वाढला आहे. विधानसभा अध्यक्ष पंडित हृदयनारायण दिक्षित हे उन्नावमधील भगवंतनगरमधून इच्छुक आहेत. मात्र त्यांनाही पक्षाने अद्याप वेटिंगवर ठेवले आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
मातोंडकर-उपाध्ये आमने सामने : १२ आमदार नियुक्तीच्या प्रश्नाचा किस

भाजपच्या ताज्या यादीत चौथ्या व पाचव्या टप्प्यासाठीचे उमेदवार आहेत. मात्र अजूनही अपना दल व निषाद पक्षाला कोणत्या जागा सोडल्या वा सोडायच्या याचा अंतिम निर्णय भाजप नेतृत्वाने जाहीर केलेला नाही. बसपा व आता सपाचा गड असलेल्या आझमगडमधील फुलपूर पवई वगळता अन्य ९ उमेदवारांची नावेही भाजपने जाहीर केलीत. बहुचर्चित आझमगड शहरातून अखिलेश मिश्रा गुड्डू यांना पक्षाने तिकीट दिले आहे. योगी सरकारमधील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
मोदी-शहांच्या राज्यात भाजप मालामाल; काँग्रेसवर मात्र कर्जाचे ओझे

प्रतापगडमधून सपाचे दबंग नेते राजा भैय्न्यया यांच्या विरोधात भाजपने सिंधुजा मिश्रा यांना तिकीट दिले आहे. पक्षाच्या प्रमुख उमेदवारांत अयोध्या - वेदप्रकाश गुप्ता, गोसाईगंज - आरती तिवारी, बीकापुर - अमित सिंह, रुदौली - रामचंद्र यादव व मिल्कीपुर - बाबा गोरखनाथ, बहराईच सदर- माजी मंत्री अनुपमा जायस्वाल, देवरिया - प्रांत प्रवक्ते शलभमणी त्रिपाठी, सुल्तानपुर - आमदार राजेश गौतम आदी ठळक नावांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com