येडियुरप्पांच्या मुलाला डावललं पण सातच दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याला संधी

निष्ठावंतांना बाजूला करून आयारामांना संधी दिल्यानं कार्यकर्ते नाराज
Basavraj Horatti with Amit Shah and Basavraj Bommai
Basavraj Horatti with Amit Shah and Basavraj Bommai Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजपमधील (BJP) मतभेद समोर आले आहेत. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. याचवेळी भाजपमध्ये सातच दिवसांपूर्वी दाखल झालेल्या बसवराज होराट्टी यांनी तिकीट देण्यात आलं आहे. यावरून आता मोठा गदारोळ सुरू झाला आहे. पक्षात निष्ठावंतांना डावललं जात असल्याबद्दल कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत. (Basavaraj Horatti News)

धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) सोडून बसवराज होराट्टी (Basavaraj Horatti) यांनी सात दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. होराट्टी हे विधान परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वासह अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर आठवडाभरापूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले होते. होराट्टी हे तब्बल 45 वर्षे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते माजी मंत्रीही आहेत. भाजपमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते 1980 पासून विधान परिषदेचे सदस्य आहेत.

Basavraj Horatti with Amit Shah and Basavraj Bommai
भाजपची पळापळ! अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी हेलिकॉप्टर पाठवून आणलं उमेदवाराला

विशेष म्हणजे, विजयेंद्र यांच्या नावाची राज्य भाजपने एकमुखाने शिफारस दिल्लीकडे केली होती. तरीही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी या शिफारशीला केराची टोपली दाखवली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. विजयेंद्र यांचे तिकीट कापण्यात आल्यानं भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. याआधी विधानसभा निवडणूक आणि पोटनिवणुकीतही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल यांनी हात झटकले. त्यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. ते म्हणाले की, विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस राज्य भाजपने एकमुखाने केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या डोक्यात काहीतरी वेगळं गणित असू शकते. विजयेंद्र यांना दुसरी संधी मिळू शकते.

Basavraj Horatti with Amit Shah and Basavraj Bommai
राज्य पेटलेलं असतानाच भाजपनं नवीन नामकरण वादाला फोडलं तोंड

कर्नाटकात विधान परिषदेच्या सात जागांसाठी 3 जूनला निवडणूक होत आहे. यातील चार जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली असून, यात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, पक्षाच्या सरचिटणीस हेमलता नायक, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. मात्र, यात येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र यांचे नाव नाही. मागील काही दिवसांपासून विजयेंद्र यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना तिकीट नाकारून येडियुरप्पांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या कोअर समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारसही करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com