J P Nadda Statement : प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा ते 'RSS'ची गरज नाही; नड्डांच्या विधानांनी BJP ची अडचण ?

J. P. Nadda News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आरएसएसला नकली म्हणतील, अशी टीका केली होती. त्यानंतर नड्डांनी केलेल्या विधानामुळे राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
J. P. Nadda
J. P. NaddaSarkarnama

BJP Political News : भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, असा दावा करताना देशातील प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी आणखी एक खळबळजनक विधान केले आहे. भारतीय जनता पार्टी आता सक्षम झाली असून आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) गरज उरली नाही, असे नड्डांनी भाष्य केले. नड्डांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या जात आहे. तर भाजप आणि आरएसएस यांच्यातील सारे काही लबेल नाही, अशीही चर्चा सुरू झाली आहे. BJP Vs RSS

जे. पी. नड्डांनी J P Nadda एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपला आरएसएसची गरज नसल्याचे म्हटले. पूर्वी भारतीय जनता पार्टी अक्षम, अशक्त असेल, त्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी आरएसएस गरज होती. आता भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजप राजकीय निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता भाजपला आरएसएसची गरज उरली नाही, असे विधान जे. पी. नड्डा यांनी केले आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray पंतप्रधान मोदी आरएसएसला नकली म्हणतील, अशी टीका केली होती. त्यानंतर नड्डांनी केलेल्या विधानामुळे राज्यासह देशातील राजाकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

जे.पी. नड्डा नेमके काय म्हणाले?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee यांच्या आणि आताच्या काळात आरएसएसची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना नड्डा म्हणाले, सुरुवातीच्या काळात भाजप छोटा पक्ष होता. त्यावेळी भाजपला वाढण्यासाठी आरएसएसची गरज होती. आता भाजप BJP सर्वात मोठा पक्ष झाला आहे. आमची यंत्रणा तळागाळात पोहचल्याने भाजप पक्ष आपोआपच काम करत आहे. हा पूर्वीच्या आणि आताच्या भाजपात मुख्य फरक आहे.

भाजपला आता आरएसएसच्या RSS पाठिंब्याची गरज नाही का, या थेट प्रश्नावर नड्डा म्हणाले, भाजप वाढली असून पक्षातील प्रत्येकाला आपापली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. तर भाजप ही एक राजकीय संघटना आहे. आरएसएस एक वैचारिक आघाडी असून त्या दृष्टीने संघ काम करतो. तर राजकीय पक्षाच्या भूमिकेनुसार भाजप आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे, याकडेही नड्डांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com