सीमाभागातील मराठी लोकांवरील हल्ल्यांमागे भाजपचाच हात..मुख्यमंत्री गप्प का?

Balasaheb Thorat : जाणीवपूर्वक सीमाभागातील मराठी बांधवांची गळचेपी केली जात आहे.
Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest News
Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

मुंबई : सीमाभागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमाप्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची,अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही.

सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका काय आहे? पुढचे धोरण काय असेल ? यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. (Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest News)

Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest News
MCD Election result 2022 : 'आप'ने भाजपच्या हातून राजधानी हिसकावली...

टिळकभवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, सीमाभागात मराठी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांमागे भाजपचा हात असून यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सीमाप्रश्नावर भाजप चुकीचे राजकारण करत आहे.

कर्नाटक (Karnatak) व केंद्रात भाजपचेच (BJP) सरकार असल्याने केंद्रातून कर्नाटकला काही सुचना येत आहेत का? हे आम्हाला माहिती नाही. मात्र हा विषय गंभीर असल्याने आपल्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून चर्चा केली पाहिजे. वस्तुस्थिती काय आहे ती आम्हाला सांगितले पाहिजे आणि आपण काय धोरण घेणार आहोत हे सांगितले पाहिजे. मराठी बांधवांवर अन्याय होत असताना महाराष्ट्राने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

Balasaheb Thorat, Eknath Shinde , Devendra Fadnavis Latest News
Grampanchyat Election : मुंडेचा `गड` असलेल्या पांगरीची ग्रामपंचायत धनंजय यांच्या ताब्यात..

कर्नाटकमधून जाणीवपूर्वक सीमाभागातील मराठी बांधवांची गळचेपी केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व मंत्री सातत्याने महाराष्ट्र विरोधी विधाने करत आहेत. कर्नाटकच्या या दंडेलशाहीविरोधात जनतेत प्रचंड रोष आहे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्पष्ट व खंबीर भूमिका घेत नाहीत. हे सर्व पाहता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सीमा प्रश्न गंभीरपणे घेतला आहे की नाही असा प्रश्न पडतो, असेही थोरात म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com