Dhnanjay Munde News : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या आणि गोपीनाथ गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांगरी ग्रामपंचायत निवडणुकीत Ncp राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. ११ पैकी १० उमेदवार बिनविरोध निवडून आणत धनंजय मुंडे यांनी ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. सरपंचपदी सुशिला कराड यांची निवड करण्यात आली आहे.
या निकालाने पंकजा मुंडे यांना धक्का बसल्याचे बोलले जाते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक मुद्दे आणि राजकारणावर लढवल्या जातात. (Beed) इथे पक्ष नसतात असे नेहमीच सांगितले जाते. (Dhnanjay Munde) परंतु गावगाडा हाकणारे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे कुणाचे तरी समर्थक असतातच. त्यामुळे या गावातल्या निवडणुकीच्या जय-पराजयाशी देखील मोठ्या नेत्याचा संबंध जोडला जातो.
तसाच पांगरी येथील निवडणुकीशी देखील तो जोडला जात असून धनंजय मुंडे यांनी पकंजा यांना धक्का दिल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ओळखला जाणार गोपीनाथ गड याच पांगरी गावात येतो. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला इथे लाखोंच्या सभा देखील होतात.
त्यामुळे गोपीनाथ गड आणि पांगरी गावाला वेगळेच महत्व आहे. त्यामुळे इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. पांगरी ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. त्यात ११ पैकी १० सदस्य बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश देखील आले.
११ पैकी १० राष्ट्रवादीचे सदस्य हे बिनविरोध होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. सरपंच पदी सरला कराड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.