Amit Shah, J.P. Nadda, Narendra Modi
Amit Shah, J.P. Nadda, Narendra ModiSarkarnama

Assembly elections News : भाजपकडून निवडणुकीची तयारीला वेग : आज नड्डा उत्तराखंडमध्ये, शाह यांची तेलंगणात सभा

BJP News : तेलंगणा राज्याच्या ११९ सदस्यांच्या विधानसभेची मुदत जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे.

New Delhi : वर्षाअखेरीस पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत असून त्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज (रविवारी) सभा होत आहे. नड्डा यांची उत्तराखंडमध्ये तर शाह यांची तेलंगणामध्ये सभा होणार आहे.

जे.पी नड्डा हे पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसोबतच अन्य काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, तर अमित शाह खम्मममध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात जनतेला संबोधित करणार आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Amit Shah, J.P. Nadda, Narendra Modi
Mumbai-Goa Highway : मनसेच्या जागर यात्रेपूर्वीच रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; भाजपाचा कार्यकर्ता आहे.., कर्तव्याला चुकणार नाही…

हरिद्वार येथील ऋषीकुल विद्यापीठाच्या आवारात स्थापन केलेल्या अमृत वाटिकेत वृक्षारोपण नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. तर दुसरीकडे शाह तेलंगणा विधानसभेची रणनीती आखणार आहेत. हा कार्यक्रम सुरुवातीला जूनमध्ये नियोजित होता पण बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याला उशीर झाला आहे.

तेलंगणा राज्याच्या ११९ सदस्यांच्या विधानसभेची मुदत जानेवारी २०२४ मध्ये संपत आहे. यंदाच्या डिसेंबरपर्यंत तिथे निवडणुकाही होतील. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तिथे आपल्या अस्तित्वासाठी लाढाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षही तिथे कामाला लागला आहे. तेलंगणात सध्या भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. त्यांनी आताच ११५ सदस्यांची यादी जाहीर केली. तर दुसरीकडे भाजपने महाराष्ट्रातील आमदारांना चाचपणीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे.

Amit Shah, J.P. Nadda, Narendra Modi
Pune Political News : मोदी सरकारला हटवण्यासाठी महाराष्ट्रातील समाजवादी संघटना एकत्र ; इंडिया आघाडीला पाठिंबा..

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि लातूर जिल्ह्यातील औशा'चे आमदार अभिमन्यू पवार यांनी तेलंगणात डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आताच या तिघांनी मंचेरियाल जिल्ह्यात वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात कोपरा सभांचा धडाका सुरू केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com