Video Amit Shah: अमित शहांना 'ते' विधान भोवणार; इंडिया आघाडीची 'सेबी'कडे धाव

India Allince Complaint To Sebi Amit Shah Statement Over Stock Market:एक्झिट पोलच्या अंदाजानंतर लगेचच शेअर बाजारानं लक्षावधी अशी झेप घेतली. सर्व रेकॉर्ड तोडले, पण दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3 जून रोजी शेअर बाजारात (stock market) मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे.

इंडिया आघाडीचे (India Allince) खासदार आज सेबीकडे शाह यांच्याविरोधात तक्रार करणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसणार असल्याचे बोलले जाते. तृणमूलचे नेते साकेत गोखले यांनी याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणीही केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांना यावेळी अंदाजे 220 जागा मिळतील असा अंदाज होता, परंतु बनावट एक्झिट पोलद्वारे लोकांमध्ये खोटं पसरवलं गेलं. यानंतर, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर लगेचच शेअर बाजारानं लक्षावधी अशी झेप घेतली. सर्व रेकॉर्ड तोडले, पण दुसऱ्याच दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, असा आरोप राहुल गांधी यांनी केली आहे.

अमित शाह यांच्याविरोधात तक्रार करण्यापूर्वी इंडिया गाडीच्या खासदारांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

Amit Shah
Khandesh Politics : आमदार किशोर पाटील यांची विधानसभेची वाट बिकट; भाजपनेच दिलं थेट आव्हान

शेअर बाजारातील चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी काँग्रेसने नुकताच केली होती. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा इंडिया आघाडीने हा प्रश्न उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com