धक्कादायक : भाजप नेत्याने केली गोळ्या झाडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःवरही गोळीबार

निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्दयावरून दोघांमध्ये वादही झाले होते.
arun yadav, priti kumari
arun yadav, priti kumarisarkarnama
Published on
Updated on

बिहार :पत्नीच्या हत्येनंतर भाजप (bjp) नेत्यानेही आत्महत्या केली. ही घटना बिहारमध्ये घडली. मुंगेरी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. शुल्लक कारणावरून पत्नीची गोळ्य़ा झाडून हत्या केल्य़ाची प्राथमिक तपासात दिसते. राजकीय वर्तुळात देखील या घटनेचा शोक व्यक्त होत आहे. (arun yadav news)

प्रीती कुमारी असे पत्नीचे नाव होते. प्रीती कुमारी (priti kumari) या महापौरपदाच्या उमेदवार होत्या. बिहारमधील मुंगेर येथील भाजप नेते अरुण यादव (arun yadav) यांनी त्याची पत्नी प्रीती कुमारी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

arun yadav, priti kumari
मनसे नेत्याच्या मुलाला धमकी ; इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे!

प्रीती कुमारी (वय ३५) यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्दयावरून दोघांमध्ये वादही झाले होते. ही घटना गुरुवारी सांयकाळी घडली. दोघांचा जागीत मृत्यू झाला आहे.

या वादात अरुण यादव (वय ४०) यांनी त्यांच्य़ा पत्नीची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर अरुण यादव यांनी आत्महत्या केली आहे.या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

अरुण यादव हे ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष होते. घटनेनंतर पिस्तूल, जिंवत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत.सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com