मलिकांसह जैन यांचं मंत्रिपदही जाणार? भाजप नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

जवळपास चार महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या मलिकांचे मंत्रिपद रद्द करण्यासाठी भाजप नेत्यानं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Supreme Court Latest Marathi News
Supreme Court Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचं मंत्रिपदही आता धोक्यात आलं आहे. जवळपास चार महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या मलिकांचे मंत्रिपद रद्द करण्यासाठी भाजप नेत्यानं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मलिक हे गंभीर प्रकरणात तुरूंगात असल्याने त्यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी न्यायालयात केली आहे. (Nawab Malik Latest Marathi News)

ईडीने 23 फेब्रुवारी रोजी मनी लाँर्डिंग प्रकरणात मलिकांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांनाही मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. जैना यांनाही मनी लाँर्डिंग प्रकरणात 31 मे रोजी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचेही मंत्रिपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका भाजपचे नेते व वकील अश्विनी उपाध्याय यांनी केली दाखल केली आहे.

Supreme Court Latest Marathi News
निवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजपचं गणित दोनच पक्ष सोडवू शकतात!

न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळून लावला असला तरी अजूनही ते मंत्री आहेत. मलिक आणि जैन यांच्यासारखे मंत्री अनेक दिवस न्यायालयीन कोठडीत राहूनही घटनात्मक पदाचा आनंद घेत आहे. ही मनमानी असून घटनेतील कलम 14 च्या विपरीत आहे. आमदार किंवा खासदाराने विधीमंडळ किंवा संसदेतील सर्व बैठकांना हजर राहायला हवे. अध्यक्षांच्या संमतीशिवाय त्यांना गैरहजर राहता येऊ नये. एवढंच नाही तर 60 दिवसांपर्यंत ते गैरहजर राहत असतील तर त्यांना पदावरून हटवावे. दोन दिवस तुरुंगात राहिले तरी त्यांचं पद रद्द करावे, असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, मलिकांविरोधात ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात मुंबईतील गोवावाला कंपाऊड संदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मलिक यांनी याबाबत ईडीच्या चौकशीत काही खुलासे केले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेल (Salim Patel) बाबतही मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता, हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची, गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. नवाब मलिक यांचा भाऊ अस्लम मलिक यांचीही गोवावाला कंपाउंडच्या संबंधित व्यवहारात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

मलिकांनी ईडीला सांगितले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता," "गोवावाला कंपाऊड संदर्भात झालेल्या व्यवहाराच्या बऱ्याच गोष्टी आपणास माहिती नव्हत्या," असे मलिक यांनी जबाबात सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com