BS Yediyurappa News : भाजपचे बडे नेते येडियुरप्पांंवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप; POCSO अंतर्गत FIR...

Karnatak Political News : येडियुरप्पा यांच्या कार्यालयातूनही निवेदन...
BS Yediyurappa News
BS Yediyurappa NewsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे दिग्गज नेते आणि कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात बंगळुरूमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात POCSO आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Political News)

बंगळुरूच्या सदाशिवनगर पोलिसांनी 17 वर्षीय एका मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एफआयआर दाखल करणारी महिला आणि तिची मुलगी एका फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागण्यासाठी येडियुरप्पा यांच्याकडे गेल्या असताना 2 फेब्रुवारी रोजी हा कथित लैंगिक अत्याचार झाला असल्याचे नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणी येडियुरप्पा (B S Yediyurappa) यांच्या कार्यालयातून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या निवेदनात दावा करण्यात आला आहे की, संबंधित तक्रारदार महिलेने अनेकवेळा केस दाखल केली आहे. अशा 53 प्रकरणांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये संबंधित तक्रारदार महिलेने वेगवेगळ्या कारणांसाठी केस दाखल केली आहे. या महिलेला अशा तक्रारी करण्याची सवयच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कोण आहेत येडियुरप्पा ?

येडियुरप्पा हे कर्नाटक भाजपचे (BJP) सर्वात वजनदार नेते आहेत. तब्बल तीन वेळा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी 2008 ते 2011 आणि 2019 ते 2021 तसेच मे 2018 मध्ये अल्प कालावधीसाठी कर्नाटचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com