बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) हिजाबवरून (Hijab) वाद पेटला असून, यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच आता शिमोग्यात (Shivmogga) बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्याकडे बोट दाखवले आहे.
ही हत्या मुस्लिम गुंडांनी केल्याचा खळबळजनक आरोप ईश्वरप्पा यांनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी हिजाब वादावर केलेल्या वक्तव्यामुळे चिथावणी मिळाली. यामुळे हर्ष याची हत्या झाली. तो अतिशय चांगला कार्यकर्ता होता. तो तरुण आणि प्रामाणिक होता. शिवकुमार यांनीच राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा झेंडा फडकावल्याचा दावा केला होता. तसेच, हिजाबविरोधी आंदोलनासाठी सुरतमझून 50 लाख भगव्या शाली मागवल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे गुंडगिरी वाढली. हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.
बजरंग दलाच्या 26 वर्षीय हर्ष या कार्यकर्त्याची काल (ता.20) रात्री शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर शिमोग्यात तणावाचे वातावरण आहे. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे.
हर्ष हा टेलर होता. त्याच्यावर चार जणांनी काल रात्री 9 वाजता हल्ला केला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तींनी अनेक वाहनांना आगी लागल्या. या प्रकरणाचा हिजाब वादाशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हर्ष आणि एका टोळक्याची ओळख होती. पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हर्ष याची हत्या करणाऱ्यांना लवकरच पकडले जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.