ग्रामविकास मंत्र्यांना अडकवण्याच्या कटाचा सूत्रधार 'महानायक'; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi 
D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते रमेश जारकीहोळी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जारकीहोळी यांना सेक्स स्कँडल प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी जारकीहोळींनी 'महानायक' सूत्रधार असल्याचा दावा केला होता. आता संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात के.एस.ईश्वरप्पा (K.S.Eshwarappa) यांना अडचणीत आणण्यामागे याच महानायकाचा हात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महानायक म्हणून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) यांच्याकडे बोट दाखवले आहे (Santosh Patil Death Case News)

मला मागील वर्षी बलात्कार प्रकरणात अडकवणाऱ्या महानायकाचाच या प्रकरणामागे हात आहे, असा दावा जारकीहोळी यांनी केला आहे. मागील वर्षी यामुळे जारकीहोळींनी जलंसपदा मंत्रिपद गमावावे लागले होते. ते म्हणाले की, मी सोमवारी या पत्रकार परिषद घेऊन सत्य समोर आणणार आहे. संतोष पाटील याच्या मृत्यूला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याचा उगलडा मी करणार आहे. माझ्याविरोधात कट करणाऱ्या गटानेच ईश्वरप्पा यांच्या विरोधात आता कट केला आहे. मी पक्षाच्या हाय कमांडची परवानगी घेऊन या प्रकरणावर बोलणार आहे.

जारकीहोळींनी उल्लेख केलेले महानायक हे डी.के.शिवकुमार आहेत. मागील वर्षी जारकीहोळींनी महानायक असा उल्लेख करीत शिवकुमार यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, ईश्वरप्पांच्या राजीनाम्यासही जारकीहोळींनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा देणे टाळावे. मी एका खोट्या गुन्ह्याचा त्रास वर्षभर सहन करतोय. हाच प्रकार ईश्वरप्पा यांच्या बाबतीत घडायला नको. तो चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना न्यायालय योग्य ती शिक्षा करा.

D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi 
विरोधकांसमोर मुख्यमंत्री झुकले! अखेर ग्रामविकास मंत्र्यांचा राजीनामा घेणार

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

D.K.Shivakumar and Ramesh Jarkiholi 
संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच ग्रामविकास मंत्र्यांचा राजीनामा

बेळगावी पोलिसांकडून पाटील यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांची सुसाईट नोटही पोलिसांना सापडली आहे. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईश्वरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ईश्वरप्पा यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com