BJP Leader Shoots Wife : धक्कादायक! भाजपच्या नेत्याने पत्नी मुलांवर झाडल्या गोळ्या ; दोन मुलांचा मृत्यू, पत्नीही गंभीर

BJP leader Yogesh rohilla shoots family : घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप पोलिसांनी दिलेले नाही.धक्कादायक बाब म्हणजे आरोपी योगेशनेच स्वत:च शेजारांना आपण पत्नी व मुलांवर गोळ्या झाडल्याची माहिती दिली.
Yogesh rohilla
Yogesh rohilla sarkarnama
Published on
Updated on

गणेश सोनावणे

Crime News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका भाजप नेत्याने पत्नी आणि तीन मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि एक मुलगा गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवलं मात्र दुर्देवाने दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांचे मृतदेह शवविश्चेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तर भाजप नेत्याची पत्नी आणि एका मुलावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपल्या कुटुंबीयांवर गोळीबार करणाऱ्या भाजप नेत्याचे नाव योगेश रोहिल्ला असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश हा अनेक दिवसांपासून मानसिक आजारी होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप पोलिसांनी दिलेले नाही.

Yogesh rohilla
Ajitdada on Munde Resign : धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याअगोदर ‘देवगिरी’वरील बैठकीत काय घडलं...कोण, कोण उपस्थित होतं?; खुद्द अजितदादांनी केला उलगडा

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी योगेशनेच स्वत:च शेजारांना आपण पत्नी व मुलांवर गोळ्या झाडल्याची माहिती दिली. हे ऐकून शेजाऱ्यांनाही धक्का बसला त्यांनी तत्काळ पोलिसांना या विषयी माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून योगेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांना या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसल्याने गोंधळ उडाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

चार वर्षांचा मुलाचा मृत्यू

योगेश हा भाजपचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे. त्याच्या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव नेहा असे आहे. तर, 10 वर्षीय मुलगी श्रद्धाआणि चार वर्षीय मुलगा देवांश यांचा देखील गोळीबाराता जागेवरच मृत्यू झाला. तर, या हल्ल्यातून 6 वर्षीचा मुलगा शिवांश हा हा गंभीर जखमी झाला होता. मात्र. त्याचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Yogesh rohilla
Congress Vs Amit Shah: ...अन् जम्मू काश्मीरबद्दलचा एकच प्रश्न विचारत काँग्रेसनं केली अमित शाहांची कोंडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com