Gujarat Police and BJP leader birthday: गुजरातमध्ये भाजप नेत्याचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा?; व्हिडिओ व्हायरल काँग्रेस आक्रमक!

Gujarat BJP Vs Congress : काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे.
Gujarat Police and BJP leaders birthday
Gujarat Police and BJP leaders birthdaySarkarnama

Gujrat BJP leader birthday in Police Station : अहमदाबादेतील एका पोलीस स्टेशनमध्ये कथितरित्या भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तेथील स्थानिक राजकीय वातावरण तापलं आहे.

व्हिडिओ फुटेजमध्ये डीसीपी कानन देसाई गुजरातच्या अहमदाबादेतील पोलीस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसोबत भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका सुरू केली आहे. शिवाय हा व्हिडिओ शेअर सुद्धा केला आहे आणि सत्तारूढ भाजपला सवाल केला आहे की, पोलीस स्टेशन भाजपचे(BJP) कार्यालय झाले आहे का? तर पोलिसांकडून असा दावा करण्यात आला आहे की, हा हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी आयोजित रक्तदान दिवसाचा कार्यक्रम होता, कोणाचा वाढदिवस नव्हता.

Gujarat Police and BJP leaders birthday
Goa DGP Jaspal Singh : गोवा पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली अटळ; केंद्राकडे पाठवला अहवाल!

व्हिडिओमध्ये अहमदाबाद झोन-4च्या पोलिस आयुक्त कानन देसाई आपले सहकारी, भाजप नेते हिमांशू चौहान आणि लोक कलावंत व भाजप नेते योगेश गढवी यांच्यासोबत एका पोलिस कक्षात दिसत आहेत. फुटेजमध्ये डीसीपी कानन देसाई आणि त्यांची पोलिस टीम वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

तर भाजप नेते हिमांशू चौहान केक कापताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अनेक काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि भाजप सरकारवर टीका केली आहे.

विधानसभेत काँग्रेस नेते अमित चावडा यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, कमलमच्या(गुजरातमधील भाजप कार्यालय) कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला 'कमलम'मध्ये बदललं आहे.

जनतेच्या सुरक्षेशिवाय पीआर-पब्लिसिटीवर केंद्रित ही वर्तणूक गुजरातच्या लोकांसाठी अपमान आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस ठाण्यांना कराच्या पैशातून निधी दिला जातो की "कमलम" चे पार्टी हॉल म्हणून काम करण्यासाठी? सरकारने उत्तर द्यावे."

Gujarat Police and BJP leaders birthday
NitishKumar and Sanjay Jha : नितीशकुमारांची मोठी खेळी,भाजपातून आलेल्या नेत्याकडेच दिलं 'JDU'चं थेट कार्यकारी अध्यक्षपद!

काँग्रेसचे नेते जगदीश ठाकोर यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, भाजप सरकार गुजरातमध्ये भाजप कार्यकर्ता आणि नेत्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस कार्यक्रमांसाठी विशेष व्यवस्था करत आहे. अहमदाबादच्या दरियापूर पोलीस स्टेशनमध्ये डीसीपी यांच्या उपस्थितीत एका भाजप नेत्याचा वाढदिवस साजरा केला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com