कार्यकारिणीत डावललं जाताच भाजप आमदाराचा थेट बंडाचा पवित्रा

भाजपने (BJP) राज्य कार्यकारिणीत मोठे फेरबदल केले असून, अनेक बड्या नेत्यांना डच्चू दिला आहे.
Hiran Chatterjee and Amit Shah

Hiran Chatterjee and Amit Shah

Sarkarnama

Published on
Updated on

कोलकता : भाजपने तातडीने राज्य कार्यकारिणीत मोठे फेरबदल करीत अनेक बड्या नेत्यांना डच्चू दिला आहे. आता कार्यकारिणीत स्थान न देण्यात आल्याने भाजप आमदाराने थेट पक्षाला अडचणीत आणणारे पाऊल उचलले आहे. अभिनेते व आमदार हिरन चटर्जी (Hiran Chatterjee) यांना कार्यकारिणीत डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी आता उघडपणे पक्षाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेतला आहे.

चटर्जी हे खरगपूर मतदारसंघातील आमदार आहेत. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ते भाजपचे एकमेव आमदार आहेत. मतदारसंघातील निर्णय त्यांना न विचारता घेत जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चटर्जी यांचा रोख पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर आहे. मी मतदारसंघात नसताना परस्पर घोष हे सगळे निर्णय घेत आहेत, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. आमदार चटर्जी यांनी पक्षाच्या सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. असे असले तरी भाजप सोडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि इतर वरिष्ठ नेत्यांना मी याबद्दल माहिती दिली होती. त्यांनी राज्यातील नेतृत्वाशी याबाबत बोलण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काहीही घडलेले नाही, असे चटर्जी यांनी स्पष्ट केले आहे. चटर्जी हे मटुआ समाजातील नेते आहेत. या समाजाच्या अनेक भाजप नेत्यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>Hiran Chatterjee and Amit Shah</p></div>
देशात ओमिक्रॉनने घेतला पहिला बळी!

कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) 144 पैकी 134 जागा जिंकत भाजपने (BJP) आणि काँग्रेसची (Congress) दाणादाण उडवली होती. यानंतर कार्यकारिणीत मोठे फेरबदल झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सुकांत मुजुमदार यांनी सप्टेंबर महिन्यात स्वीकारल्यानंतर फेरबदल होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका निवडणुकीमुळे ते लांबणीवर पडले होते. पाच राज्य सरचिटणीसांपैकी खासदार लॉकेट चटर्जी आणि ज्योतिर्मय महातो या दोघांचे पद कायम राहिले आहे. अग्निमित्रा पॉल, दीपक बर्मन आणि जगन्नाथ चट्टोपाध्याय यांची आता सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Hiran Chatterjee and Amit Shah</p></div>
राजकारण पेटलं! उमेदवारी मिळण्याआधीच बड्या नेत्याची हत्या

अग्निमित्रा पॉल यांच्या जागी तनुजा चक्रवर्ती यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाचा लोकप्रिय चेहरा असलेले जयप्रकाश मुजुमजदार यांना उपाध्यपदावरून डच्चू देण्यात आला. ते आता केवळ प्रवक्ते आहेत. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी अली होसेन यांच्या जागी चार्ल्स नंदी यांनी निवड झाली. खासदार सौमित्र खान यांच्याकडून राज्य भाजयुमोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com