PSI recruitment scam : बंगळूर : पीएसआय भरती घोटाळ्यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओमध्ये भाजप (BJP) आमदार बसवराज दडेसुगुरु यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे संभाषण आहे. ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. तर विरोधीपक्षांकडून चौकशीची मागणी होत आहे.
पीएसआय (PSI) भरती घोटाळ्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच उमेदवारांकडून पैसे घेतल्याची कबुली दिल्याची घटना समोर आली आहे. कोप्पळ जिल्ह्यातील कनकगिरी मतदारसंघाचे भाजप आमदार बसवराज दडेसुगुरु (Basavaraj Dadesuguru) यांनी पीएसआय भरतीमध्ये पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. परसाप्पा यांच्या मुलाच्या नियुक्तीसाठी पैसे घेतलेला ऑडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. दढेसुगुरु यांनी बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा येथील परसप्पा नावाच्या व्यक्तीकडून पैसे घेतल्याची कबुलीच दिली आहे. त्यातच पैसे परत मागितल्याबद्दल परसाप्पा यांना तंबी दिली आहे.
कनकगिरीचे आमदार दढेसुगुरु यांनी बेकायदेशीर भरतीत सरकारला पैसे दिल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त विरोधी पक्ष आमदाराच्या अटकेची मागणी करत आहेत. याबाबत बोलताना केपीसीसीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील म्हणाले की, आमदारांनी व्हायरल झालेल्या ऑडिओबाबत खुलासा करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे. सोमवारी शहरातील गवी मठाला भेट दिली असता त्यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.
या प्रकरणी सरकारने उत्तर द्यावे. बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे सरकारला दिल्याचे त्यांनी सांगितले. आमदाराला तात्काळ अटक करावी. या प्रकरणात जो कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. 40 टक्के कमिशन सरकारचे असल्याचा आरोप केम्पण्णा या ठेकेदाराने केला आहे, त्यामुळे कर्नाटच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या बाबतीत आमदार दडेसुगुरु म्हणाले, आवाज माझा आहे. मात्र, मी पैसे घेतलेले नाही. भांडण सोडवण्यासाठी दोघे माझ्याकडे आले होते. ते मी मिटविले, असे त्यांनी सांगितले. पीएसआय भरती घोटाळ्यात कोणीही सामील असला तरी त्यांची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. नव्याने होत असलेल्या आरोपींचीही चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.