Mahakumbh 2025 Live : चेंगराचेंगरीनंतर भाजप खासदारानं महाकुंभमध्ये केलं शाही स्नान; सनातन हा जगातील एकमेव धर्म

BJP MP Takes Royal Bath After Mahakumbh Stampede : सनातन हा जगातील एकमेव धर्म आहे जो सर्व धर्मांचं स्वागत करतो. सनातन धर्म कोणत्याही धर्माला विरोध करत नाही, मग तो मुस्लीम असो किंवा ख्रिश्चन.”
Hema Malini
Hema Malini Sarkarnama
Published on
Updated on

Mahakumbh News: मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर स्नान करण्यासाठी प्रयागराज येथील महाकुंभमेळाव्यात भाविकांची झुंबड उडाली आहे. आज पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारात महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली, यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेच्या काही तासानंतर भाजपच्या खासदार, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी शाही स्नान केले. महाकुंभमध्ये कथाकार देवकीनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सनातन धर्म संसदेत हेमा मालिनी या पोहोचल्या होत्या.

शाही स्नान करण्यापूर्वी त्या म्हणाल्या, “आमच्या सनातन धर्माबद्दल आणि सनातनी लोकांबद्दल वाईट बोलणारे काही अज्ञानी लोक आहेत. काही चुकीच्या गोष्टी सांगतात. सनातन हा जगातील एकमेव धर्म आहे जो सर्व धर्मांचं स्वागत करतो. सनातन धर्म कोणत्याही धर्माला विरोध करत नाही, मग तो मुस्लीम असो किंवा ख्रिश्चन.”

Hema Malini
Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 10 जणांचा मृत्यू तर शेकडो भाविक जखमी, अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय

"सर्व सनातन धर्माच्या भाविकांसाठी ही भाग्याची बाब आहे की 144 वर्षांना प्रयागराज येथे महाकुंभमेळा होत आहे. देवकी नंदन ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी सनातन बोर्ड स्थापन करण्यासाठी चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे सनातन धर्माचे रक्षण होण्यास मदत होईल," असे भाजपच्या खासदार हेमा मालिनी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com