भाजप खासदार म्हणतात, सरपंचाला 15 लाखापर्यंतचा भ्रष्टाचार माफ!

सात लाख निवडणुकीवर खर्च होतो, तर इतर सात लाख पुढील निवडीसाठी खर्च होतात, असं समर्थन त्यांनी केलं आहे.
BJP

BJP

Sarkarnama

Published on
Updated on

नवी दिल्ली : ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असं म्हणत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पक्षाच्या खासदारांना मात्र पटलेले दिसत नाही. एका खासदाराने सरपंचाला 15 लाखापर्यंतचा भ्रष्टाचार करण्यासाठी सूट देऊन टाकली आहे. पंधरा लाखापुढचा भ्रष्टाचार असेल तरच माझ्याकडे तक्रार घेऊन या, असं या खासदाराने जाहीर सभेत सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपचे (BJP) मध्य प्रदेशातील खासदार जनार्दन मिश्रा (Janardan Mishra) यांचं हे वक्तव्य सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने मिश्रा अडचणीत सापडले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना मिश्रा यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, सरपंच भ्रष्टाचार करत असल्याचे सांगत लोक माझ्याकडे येतात. मी गंमतीमध्ये लोकांना म्हणतो की सरपंचाने 15 लाखापर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल तर माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. पंधरा लाखापुढील भ्रष्टाचार असेल तरच या.

<div class="paragraphs"><p>BJP</p></div>
राष्ट्रीय पातळीवरील पहिल्याच परीक्षेत विनोद तावडे नापास...

मिश्रा यावरच थांबले नाहीत. त्यांनी सरपंचांच्या 15 लाखांपर्यंतच्या भ्रष्टाचाराचे समर्थनही केले आहे. ते म्हणाले, सात लाख तर निवडणुकीवर खर्च होतात आणि उरलेले सात लाख रुपये पुढील निवडीसाठी असतात. त्यामुळे पक्षाचा सरपंच जर त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार करत असेल तर माझ्याकडे तक्रार करा, असे मिश्रा म्हणाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना जोरदार टीका केली आहे.

घरात कोट्यवधी ठेवून तो फिरायचा स्कूटरवर

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुगंधी द्रव्ये आणि अत्तराचे व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर छापा टाकून वस्तू व सेवा कर गुप्तचर संचालनालयाने (DGGI) तब्बल दोनशे कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. जैन यांना आता अटक करण्यात आली असून, त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.

जैन यांचे मूळ शहर कनौज आहे. कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक असलेले जैन हे कनौजमध्ये आल्यानंतर त्यांच्या जुन्या स्कूटरवर शहरात हिंडायचे. कनौजमधील त्यांच्या घरासमोर क्वालिस आणि मारुती असा दोन कार उभ्या आहेत. परंतु, ते कायम स्कूटरवर फिरायचे. पीयूष जैन यांचे पिता हे केमिस्ट होते. त्यांच्याकडूनच त्यांनी अत्तर बनवण्याची प्रक्रिया शिकून घेतली.

कानपूरमध्ये त्यांनी सुरू केलेला अत्तर व्यवसाय आता देशातील 15 राज्यांमध्ये पसरला आहे. जैन यांचा व्यवसाय विस्तार मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अत्तराचा व्यवसाय विस्तारल्यानंतर जैन आणि त्यांचे बंधू अंबरीश यांनी कनौजमदील 700 चौरस यार्डच्या जुन्या घराचे हवेलीत रुपांतर केले. असे असले तरी जैन हे नेहमी साधेपणाने राहत. ते कनौजमध्ये आल्यानंतर जुन्या स्कूटरवरून फिरण्यास पंसती देत असत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com