Shripad Naik : सलग सहाव्यांदा लोकसभा गाठणाऱ्या श्रीपाद नाईकांना व्हायचंय गोव्याचं मुख्यमंत्री?

Chief Minister of Goa and Shripad Naik : पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं सूचक उत्तर; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Shripad Naik
Shripad NaikSarkarnama
Published on
Updated on

Goa BJP Politics : भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी सलग सहाव्यांदा लोकसभेत जात विजयाची दुहेरी हॅट्रीक साधली. एवढेच नव्हे तर सलग दुसऱ्यांदा त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. पण, झालेली लोकसभा निवडणूक माझी शेवटची निवडणूक असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

त्याचवेळी त्यांनी स्थानिक राजकाराणाबाबत मोठे सूतोवाच केले आहे. स्थानिक राजकारणात उतरण्यास सांगितले तर मी निश्चित विचार करीन', असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले आहे.

गोवा मराठी पत्रकार संघातर्फे गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या (गुज) सभागृहात 'गुज'च्या सहयोगाने श्रीपाद नाईक यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर गोवा मराठी पत्रकार संघाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष जयंत संभाजी, उपाध्यक्ष वामन प्रभू, गुरुदास सावळ, सचिव सुभाष नाईक व 'गुज'चे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते.

Shripad Naik
Assembly By Elections : विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला; भाजप अन् काँग्रेसकडून उमेदवार जाहीर!

आपल्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत नाही का, अशा एका प्रश्नावर 'नशिबात असेल तर मिळेल', असे श्रीपाद उत्तरले. शेवटी सामाजिक घटकांसाठी काम करणे महत्त्वाचे, असेही ते म्हणाले. श्रीपाद नाईक यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

श्रीपाद नाईक यांनी उत्तरेत काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना एक लाखाहून अधिक मताधिक्य घेऊन पराभूत केले. सहाव्यांदा संसदेत गेलेल्या नाईकांना दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपदाची संधी देखील देण्यात आली आहे. ही अखेरची निवडणूक आहे असे म्हणत असलेल्या नाईकांना भविष्यातील मुख्यमंत्रिपदाच्या संधीची देखील आशा असल्याचे त्यांच्या विधानातून दिसून येते.

Shripad Naik
Chandrababu Naidu : सभापतीपदावरून एनडीएत मतभेद! चंद्राबाबूंनी घेतली वेगळी भूमिका ?

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्यात आले. सावंत गेल्या पाच वर्षापासून यशस्वीपणे पद सांभाळत आहेत. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपचे अनेक चेहरे असल्याने 25 वर्षे उत्तरेचा एकहाती गड राखणाऱ्या श्रीपाद नाईकांना ही संधी मिळेल का? हे पुढील काळातच समजू शकेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com