वरुण गांधी थांबेनात; आता थेट पंतप्रधान मोदींनाच आणलं अडचणीत

वरुण गांधी यांच्या सततच्या भाजपविरोधी वक्तव्यांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Varun Gandhi
Varun GandhiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपचे (BJP) खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) मागील अनेक दिवसांपासून केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजपच्या सरकारवर निशाणा साधत आहेत. सोमवारी तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. त्यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मोदींच्या लाखोंच्या सभांवरून हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

उत्तर प्रदेशात पुढील दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत पंतप्रधान मोदींचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यातच सध्या ओमिक्रॉनचे संकटे घोंघावत असल्याने उत्तर प्रदेशात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे लाखोंच्या सभा आणि दुसरीकडे रात्रीची संचारबंदी यावरून वरुण गांधी यांनी टीका केली आहे.

Varun Gandhi
अकोल्याचे कालीचरण महाराज अडचणीत; विधानसभेत अजितदादांनीच दिले स्पष्ट संकेत...

वरुण गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, रात्री संचारबंदी आणि दिवसा सभांसाठी लाखो लोकांना गोळा करणे, हे सर्वसामान्य लोकांच्या समजण्यापलीकडे आहे. उत्तर प्रदेशातील मर्यादित आरोग्य सुविधा विचारात घेऊन आपल्याला प्रामाणिकपणे प्राधान्य निश्चित करायला हवे. भीतीदायक ओमिकॉनचा प्रसार रोखायचा आहे की निवडणूकीचे शक्ती प्रदर्शनाला प्राधान्य देणार आहोत, असा सवाल वरुण गांधी यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरूण गांधी यांना काही दिवसांपूर्वीच डच्चू दिला आहे. पक्षाविरोधात सतत भाष्य करत असल्याने हे पक्षानं हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. पण त्यानंतरही वरूण यांनी आपल्याच सरकारवर टीका करणं थांबवलेलं नाही. आठवड्याभरापूर्वी तर त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना पक्षासह हिंदूत्ववाद्यांनाही थेट अंगावर घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी यांचे हे सूचक वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

एका युवकाने जय श्रीरामच्या घोषणा देण्यावरून वरूण गांधी म्हणाले, आता जय श्रीरामच्या घोषणा देण्याऐवजी जय हिंद च्या घोषणा देण्याची वेळ आली आहे. सगळ्या लोकांना एकत्र करा, देशभक्तीची भावना निर्माण करा. मर्यादा पुरूषोत्तम रामही सगळ्यांना जोडण्याचे काम करत होते. आपल्या सगळ्यांना हिंदूस्तान उभा करायचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com