BJP Politics in Harayana : भाजपमध्ये चाललंय काय? तिकीट कापल्यानंतर माजी मंत्री ढसाढसा रडल्या...

BJP Canditate list in haryana vidhan sabha Election 2024 kavita jain : तिकीट कापलेल्या माजी मंत्र्यांनी अश्रू अनावर झाले आहेत. सध्या भाजपमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरु आहे.
harayana vidhansabha election kavita jain bjp leader
kavita jainSarkarnama
Published on
Updated on

Haryana Assebmly Latest Update : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी 67 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर होताच सोनीपत मतदारसंघातून तिकीट कापलेल्या माजी कॅबिनेट मंत्री कविता जैन यांना अश्रू अनावर झाले आहेत. हरियाणातील भाजपच्या बड्या नेत्यांचे तिकिट कापल्यांने पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लाट निर्माण झाली आहे. भाजपने निखिल मदान यांना सोनीपतमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे अनेक दिग्गज नेते पक्षाविरोधात उघडपणे बोलत असून राजीनाम्यांचे सत्र सुरु झाले आहे. पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

भाजपनं (BJP) उमेदवारी नाकारल्याने माजी कॅबिनेट मंत्री कविता जैन कार्यकर्त्यांशी बोलतांना ढसाढसा रडल्या. यावेळी त्या म्हणाल्या "पक्षाने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. त्यांचा या तिकिटावर अधिकार नाही, राजीव जैन आणि मी पक्षाचे प्रत्येक काम चोख केले आहे. आम्ही पक्षाकडे तिकीट बदलण्याची मागणी करतो. यासंदर्भात आम्ही 8 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक बोलावली असून त्यात मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पुढे काय करायचे ते त्यांचे कार्यकर्ते ठरवतील, असे कविता जैन यांनी सांगितले. काल यादी जाहीर झाल्यानंतर जैन यांच्या अनेक समर्थकांनी रात्री उशिरा भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

harayana vidhansabha election kavita jain bjp leader
Haryana Election : उमेदवारीवरून भाजपमध्ये घमासान; आमदारानंतर तीन बड्या नेत्यांनी दिला झटका...

भाजपला इशारा दिला.

माजी मंत्री कविता जैन यांचे तिकीट रद्द होताच. व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करून भाजप हायकमांडबद्दल नाराजी व्यक्त करत आपली पदे सोडण्याचा निर्णय जाहीर केला. जैन यांना तिकीट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पक्षाच्या 28 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी तिकीट बदलण्याच्या मागणीसाठी भाजपला इशारा दिला आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये नगरसेवक इंदू वालेचा आणि त्यांचे पती संजीव वालेचा, किसान मोर्चाचे महाराजा अग्रसेन मंडळाचे अध्यक्ष अशोक आणि मंडळाचे सरचिटणीस रजत जैन आदींचा समावेश आहे.

harayana vidhansabha election kavita jain bjp leader
Haryana Election : उमेदवारीवरून भाजपमध्ये घमासान; आमदारानंतर तीन बड्या नेत्यांनी दिला झटका...

भाजपने कोणाला दिले तिकीट?

हरियाणा (hariyana) भाजप उमेदवार यादीत भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे. भाजपने फरिदाबादमधून विपुल गोयल, गुडगावमधून मुकेश शर्मा आणि नारनौलमधून कॅप्टन अभिमन्यू यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर सोनीपतमधून निखिल मदन आणि खरखोडा येथून पवन खरखोडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

याशिवाय गोहाना येथून अरविंद शर्मा आणि अटेलीमधून कुमारी आरती सिंह राव यांना तिकीट देण्यात आले आहे. बल्लभगडमधून मूलचंद शर्मा, तिगावमधून राजेश नगर, पृथलामधून चेक चंद शर्मा, पलवलमधून गौरव गौतम, सोहनामधून तेजपाल तंवर, बादशाहपूरमधून राव नरबीर सिंग, रेवाडीतून लक्ष्मण सिंग यादव, कोसलीमधून अनिल दहिना, नांगलमधून अभय सिंग यादव, चौधरी यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com