हिजाबचा वाद तमिळनाडूत! विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला दाखवला बाहेरचा रस्ता

कर्नाटकात हिजाबवरून (Hijab) वाद पेटला असून, याचे लोण आता तमिळनाडूत पोचले आहे.
Hijab Row
Hijab RowSarkarnama
Published on
Updated on

चेन्नई : कर्नाटकात (Karnataka) हिजाबवरून (Hijab) वाद पेटला असून, याचे लोण आता तमिळनाडूत (Tamil Nadu) पोचले आहे. तमिळनाडूत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत यावरून वाद सुरू झाला आहे. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्याने हिजाब घातलेल्या महिलेला मतदान केंद्रात आक्षेप केल्याने हा वाद झाला होता. अखेर या भाजप कार्यकर्त्यालाच बाहेर काढण्यात आले.

मेलूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 8 मधील मतदान केंद्रावर हा वाद झाला. एक मुस्लिम महिला हिजाब आणि मास्क घालून मतदानासाठी आली होती. त्यावेळी भाजपचा पोलिंग एजंट गिरीराज याने याला आक्षेप घेतला. त्याने महिलेने हिजाब काढून टाकावा, अशी मागणी केली. मतदार यादीतील तिचे नाव पुन्हा तपासावे, असेही गिरीराज म्हणाला. संबंधित महिलेने हिजाब आणि मास्क काढून टाकावा आणि मतदारयादीतील फोटोशी तिची पडताळणी केली जावी, अशी आक्रमक भूमिका गिरीराजने घेतली.

Hijab Row
वाद पेटला! लाल टिळा लावलेल्या विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश नाकारला

यावरून वाद सुरू झाला. सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकचे नेत्यांनी यात हस्तक्षेप केला. विनाकारण वाद निर्माण करणाऱ्या पोलिंग एजंटला तेथून हटवण्याची सूचना त्यांनी भाजपली केली. गिरीराज याने घातलेल्या वादामुळे मतदान केंद्रावरील मतदान 15 मिनिटे थांबले होते. अखेर त्याला तेथून बाहेर पाठवण्यात आल्यानंतर मतदान सुरू झाले. यावरून द्रमुकसह अण्णाद्रमुकने भाजपवर टीका केली आहे.

Hijab Row
शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांच्यामागे आयटी, सीबीआयचा ससेमिरा

कर्नाटकात अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे. राज्यातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिला आहे. यात हिजाब आणि भगवे उपरणे हे दोन्ही घालून शाळा व महाविद्यालयांमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com