Telangana Assembly Elections News : तेलंगणा विधानसभेची तयारी भाजपने सुरु केली आहे.तेलंगणा आगामी विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने त्यासाठी रणनीती राखली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या घरी नुकतीच याबाबत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत तेलंगणा भाजपचे अनेक वरिष्ठ नेता सहभागी झाले होते. तेलंगणा भाजपा अध्यक्ष बंदी संजय यावेळी उपस्थित होते. भाजपकडून या बैठकीची माहिती गोपनीय ठेवली आहे. तेलंगणा विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती ठरविण्यात आली, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना राखण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि काँग्रेसनेही आपली निवडणूक तयारीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमी भाजपने रणनीती तयार केली आहे. होळीनंतर एका महिन्यापर्यंत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या १० पेक्षा जास्त सभा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने याचा समारोप होईल.
सध्या दिल्ली दारुगैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहे. असाच दारुगैरव्यवहार आता तेलंगणा येथे चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीआरएसच्या खासदार के कविता यांचा यात समावेश असल्याच आरोप भाजपने केला आहे. तर के.कविता यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. दारुगैरव्यवहार प्रकरणी हैदराबाद येथील एका चार्टर्ड अकाउंटला सीबीआयने अटक केली आहे. त्याचा संबधी या प्रकरणाशी असल्याचे आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईमुळे दिल्लीनंतर आता तेलंगणाच्या राजकीय पटलावर काय होते, हे लवकरच समजेल.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने अटकेला आव्हान देणारा सिसोदिया यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.