Surprise BJP President : भाजप ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत : अध्यक्षपदासाठी मोदी-शाहंच्या डोक्यात सरप्राईज नाव; संघही अनुकूल

Modi Shah Surprise Candidate News: येत्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

BJP President 2025 Surprise Pick by Modi-Shah: भाजपच्या संघटनात्मक निवडीला गेल्या काही दिवसापासून वेग आला आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील प्रदेशाध्यक्ष निवड करण्यात आली असल्याने येत्या काळात लवकरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.

येत्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने भाजपमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पहिल्यांदाच एखाद्या महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष पदावर संधी देऊ शकतो.

गेल्या काही दिवसांपासून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती पक्षातील उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे. महिला नेतृत्वासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे आता निवडीसंबधीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर भाजपकडून देशभर संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या. आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

BJP Flag
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-शिंदेंना धसका... घाम फोडणारा मुंबईचा अंदाज समोर!

येत्या काळात भाजपकडून संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला जाणार असून महत्त्वपूर्ण बदल करून पहिल्यांदाच एका महिलेला राष्ट्रीय अध्यक्षपदी संधी दिली जाऊ शकते. या पदासाठी भाजपकडून निर्मला सीतारमण (Nirmla sitaraman), वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा आहे. या निवडीमुळे संघटनात्मक संतुलन, महिला सक्षमीकरण आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय येत्या काळात घेतला जाणार आहे.

BJP Flag
Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 'राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन...?'; 'या' बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी महिलेला देण्यात यावी, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता या पदासाठी अनेक महिला नेत्यांच्या नावांचा विचार सुरू झाला आहे.

देशाच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. निर्मला सीतारमण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महासचिव (संघटन) बी. एल. संतोष यांची भेट घेतली. दक्षिणेतील महिला चेहरा देऊन दक्षिण भारतासह महिलांना अपील करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

BJP Flag
MNS Vs BJP : 'बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, कानाखाली बसेल...' भाजप आमदाराला मनसेचा थेट इशारा

निर्मला सीतारमण यांच्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या तीन नावापैकी एक नाव फायनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

BJP Flag
NCP News : राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी स्वतःचा एरिया सोडला; घुसखोरी झाल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com