भाजपची कुरघोडी : सन्मानजनक जागा मिळविण्यासाठी अमरिंदरसिंगाची कसरत

Punjab Election : कॅप्टन अमरिंदरसिंग आणि अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट
 Amarinder Singh meet amit shah on ahead of Punjab Election

Amarinder Singh meet amit shah on ahead of Punjab Election

File Photo
Published on
Updated on

दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे (Punjab lok congress) संस्थापक कॅप्टन अमरिंदरसिंग (Amrinder Singh) यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांच्यात दीर्घ बैठक पार पाडली. या बैठकीत भाजप, अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि ज्येष्ठ अकाली नेते सुखदेवसिंग ढिंडसा यांचा पक्ष अशा युतीचे उमेदवार ठरवणे, संयुक्त जाहीरनामा करणे यासाठी २ जणांची समिती बनवण्यावर या नेत्यांमध्ये एकमत झाले.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पाचव्यांदा अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेत चर्चा केली आहे. भाजपचे पंजाब प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Gajendrasinha Shekhawat) यांनी सांगितले की, या युतीचे जागावाटप आणि जाहीरनामा एकच असणे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. येत्या पंजाब निवडणुकीमध्ये (Punjab Election 2022) भाजप आणि अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाबमध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास बाळगून आहे. ३ वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंजाबामध्ये भाजपच्या विरोधात धगधगणारा शेतकऱ्यांचा रोष कमी होईल, अशी आशा भाजप नेतृत्वाला आहे.

<div class="paragraphs"><p> Amarinder Singh meet amit shah on ahead of Punjab Election </p></div>
महाराष्ट्र 'हायरिस्क'वर : ६ दिवसांत रूग्णसंख्या तिप्पट, मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये!

त्याच बरोबर आज झालेल्या पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Punjab local body Election) निवडणुकांमध्ये १२ जागा जिंकून भाजपने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले असल्याने आत्मविश्वास वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग आणि भाजप यांच्या युक्तीने पंजाब मधल्या सर्व जागा लढवण्याचे ठरवले आहे. मात्र या तडजोडीमध्ये सन्मानजनक जागा पदरात पाडून घेण्यासाठी अमरिंदरसिंग यांना कसरत करावी लागणार आहे.

अकाली दलाशी युती असताना भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत होता. मात्र आता बदललेल्या समीकरणांमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे असे भाजप नेतेच सांगू लागले आहेत. या युतीमध्ये भाजपला ७० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत असेही सांगितले जाते, त्याला अमरिंदरसिंग आणि ढिंढसा कितपत तयार होतील याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. पण जागावाटपात अमरिंदरसिंग यांच्या नव्या पक्षाच्या तुलनेत भाजपचा वरचष्मा हवा अशी भूमिका भाजपने घेतल्याचे सांगण्यात येते.

<div class="paragraphs"><p> Amarinder Singh meet amit shah on ahead of Punjab Election </p></div>
पटोलेंनी अध्यक्षपद सोडण्यातील धोका ठाकरे आणि अजितदादांनी ओळखला होता...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्व-पक्षाला रामराम करण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र यापूर्वी जेव्हा त्यांनी काँग्रेस आणि अकाली दल सोडले होते तेव्हा त्यांच्याकडे पंजाबशी संबंधित मुद्दे होते. मात्र यावेळी त्यांनी व्यक्तिगत अपमान हाच मुद्दा समोर ठेवला आहे. त्यामुळे सध्या ते आणि भाजप पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमावर जोरदार हल्ला चढवत आहे. आगामी काळात हा हल्ला वाढत जाईल अशी स्पष्ट चिन्हे आहे दिसत आहेत.

पंजाबमध्ये भाजप 'झिरो' होणार आहे, या समजुतीला आजच्या पंचायत निवडणुकांच्या निकालांनी दे धक्का दिल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषक सईद अंसारी यांनी नोंदवले. अंसारी यांच्या मते 'सिद्धू फॅक्टर' काँग्रेसला मोठा फटका देईल अशी आशा अकाली दल आणि भाजपसह सर्व काँग्रेस विरोधकांना वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com