BJP VS AAP: दिल्लीत भाजप वाढवणार 'आप'च्या केजरीवालांची धडधड? मतदानापूर्वीच मोठा कौल समोर

Delhi Assembally Election 2025 : याठिकाणी आम आदमी पक्ष, भाजपचे व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे याठिकाणी किंगमेकर कोण ठरणार याची उत्सुकता देशवासियाला लागली आहे.
Narendra Modi, Arvind kejriwal
Narendra Modi, Arvind kejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. 5 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निवडणुकीमुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले होते. याठिकाणी आम आदमी पक्ष, भाजपचे व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे याठिकाणी किंगमेकर कोण ठरणार याची उत्सुकता देशवासियाला लागली आहे. त्यातच मतदानापूर्वीच निवडणूक निकालाचे अंदाज अचूक वर्तवणाऱ्या फलोदी सट्टाबाजाराने दिल्लीतील 70 जागांचा अंदाज जाहीर केला आहे.

दिल्लीत कोण जिंकणार ? याची सर्वत्र चर्चा असताना फलोदी सट्टाबाजाराने वर्तवलेल्या अंदाजानुसार या निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP) आघाडी मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत 36 हा बहुमताचा आकडा आहे. फलोदी सट्टा बाजाराने यापूर्वी 'आप'ला 37-39 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. आता नवीन अंदाज जाहीर केला असून त्यामध्ये आपला 38 ते 40 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सट्टाबाजारानुसार आप दिल्लीत हॅट्ट्रिक करणार असे दिसत आहे.

2015 च्या निवडणुकीत आपने 67 जागी विजय मिळवला होता तर 2020 मध्ये 62 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक यश मिळवले होते. फलोदी सट्टा बाजाराने लावलेला अंदाज आपसाठी बूस्टर ठरु शकतो. मात्र, यावेळेचे यश हे मागच्या वेळेप्रमाणे असणार नाही, असा अंदाज सट्टाबाजाराने लावला आहे. यावेळेस आम आदमी पक्षाला काठावरील बहुमत मिळणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला फलोदी मार्केटने अंदाज लावला होता की भाजपला 25 ते 35 जागा मिळतील. आता त्यामध्ये बदल करून 31 ते 33 जागांवर भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 36 जागांच्या बहुमताच्या आकड्यापेक्षा कमी आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या पारड्यात तीन जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. आता काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.

फलोदी मार्केटच्या अंदाजानुसार दिल्लीत आम आदमी पक्ष व भाजपमध्ये (BJP) काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. आपला काठावरील बहुमत मिळणार आहे. आपला 38 ते 40 जागा मिळू शकतात तर दुसरीकडे भाजपला 31 ते 33 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. तीन ते चार जागांचा फरक पडल्यास निकाल बदलू शकतो, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दिल्लीतील महत्वाच्या जागांवरील अंदाज पुढीलप्रमाणे नवी दिल्ली: या जागेवर आपचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसने संदीप दीक्षित यांच्यात लढत आहे. सट्टेबाजाराच्या मते, अरविंद केजरीवाल येथे पुढे आहेत.

कालकाजी: या मतदारसंघात मुख्यमंत्री आतिशी, भाजपचे रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा निवडणुक लढवत आहेत. सट्टाबाजाराच्या अंदाजानुसार येथे आतिशी या आघाडीवर आहेत.

जंगपुरा: या विधानसभा मतदारसंघात आपकडून मनीष सिसोदिया, भाजपचे तरविंदर एस मारवाह आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी निवडणूक लढवत आहेत. फलोदी सट्टाबाजारानुसार, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत. या तीनही जागांवर आप, भाजप व काँग्रेसमध्ये कडवी लढत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com