Punjab Loksabha Election : पंजाबमध्ये भाजप स्वबळावरच लढणार; शिरोमणी अकाली दलाशी बोलणी फिस्कटली?

Punjab BJP News : पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान पार पडणार आहे.
Sunil Jakhar
Sunil JakharSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : भाजपने मंगळवारी पंजाबमध्ये स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे आता भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने आता पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान पार पडणार आहे. जे लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी अंतिम टप्प्यात होणार आहे.

भाजपचे पंजाब प्रमुख सुनील जाखड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून म्हटले की, भाजप पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे भविष्य आणि तरुण, शेतकरी, व्यापारी, कामगारांसह वंचित वर्गाच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. याचबरोबर जाखड यांनी विश्वास व्यक्त केला की, पंजाबची जनता एक जून रोजी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान करेल आणि पक्षाला बळकट करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Jakhar
Eknath Shinde and Vijay Shivtare : एकनाथ शिंदे पाठवणार शिवतारेंना नोटीस, भूमिकेवर ठाम राहिल्यास पक्षातून हकालपट्टी?

साधारण आठवडाभरापूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिरोमणी अकाली दलशी युतीसंदर्भात म्हटले होते की, चर्चा सुरू आहे. आम्ही सर्व एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र आणू इच्छितो. मात्र, शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल भाजपशी चर्चेच्या मुद्द्यावर काही प्रतिक्रिया देण्यापासून कायम दूरच राहिले होते.

शिरोमणी अकाली दलाने रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांवरून सप्टेंबर 2020मध्ये भाजपच्या(BJP) नेतृत्वातील एनडीए आघाडीतून बाहेर पडणे पसंत केले होते. दोन्ही पक्ष 1996 पासून युतीमध्ये होते आणि सोबतच निवडणुकीला सामोरे जात होते. 2019मध्ये पंजाबमध्ये प्रत्येकी दोन-दोन लोकसभेच्या जागाही जिंकल्या होत्या.

Sunil Jakhar
Assembly Elections 2024 : भाजपकडून ‘खेला’! काँग्रेसमधील 'त्या' सहा बंडखोरांना उमेदवारी

जाखड म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपकडून झालेले काम, कोणापासून लपून राहिलेले नाही. शिवाय, त्यांनी असाही दावा केला की, मागील दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांची पिकांची किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली गेली आहे आणि शेतकऱ्यांना आठवडाभराच्या आत त्यांच्या बँक खात्यांवर पैसे मिळाले आहेत.

अशी चर्चा आहे की, भाजपने पंजाबमध्ये 13 पैकी सहा जागांची मागणी केली होती, तर अकाली दल यावर सहमत नव्हते. लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याचे संकेत देत त्यांनी शुक्रवारी आपल्या कोअर समितीच्या बैठकीत एक प्रस्ताव पारीत करत म्हटले होते की, ते सिद्धांतांना राजकारणापेक्षा वर काय ठेवतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com