पराभवाच्या भीतीनं भाजप राज्यसभेला उमेदवारच देणार नाही

पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवरून उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे.
पराभवाच्या भीतीनं भाजप राज्यसभेला उमेदवारच देणार नाही

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवण्यासाठी जोर लावला होता. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत भाजपच्या मनसुबे उधळून लावले. निवडणुकीनंतर अनेक बड्या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला. तसेच अनेक नेतेही तृणमूलच्या वाटेवर आहेत. त्यातच राज्यसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

भाजपनं राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारच न उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पराभवाच्या भीतीने उमेदवार दिला जात नसल्याची टीका होऊ लागली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटरवरून उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. 'भाजप उमेदवार देणार नाही. निकाल आधीच ठरलेला आहे. आमचं संपूर्ण लक्ष्य आता मुख्यमंत्री यावेळी निवडून येणार नाहीत, यावरच असेल', असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

पराभवाच्या भीतीनं भाजप राज्यसभेला उमेदवारच देणार नाही
गांधी जयंतीदिनी कन्हैया अन् मेवाणी होणार काँग्रेसवासी

तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुष्मिता देव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारच दिला जाणार नसल्यानं त्या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच देव या काँग्रेसमधून तृणणूलमध्ये दाखल झाल्या आहेत. तृणमूलचे नेते मानस भूनिया हे विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर देव यांना संधी देण्यात आली आहे.

तृणमूलकडे राज्यसभेच्या 16 पैकी 11 जागा आहेत. तर काँग्रेसकडे दोन आणि डाव्या पक्षांकडे एक जागा आहे. मागील आठवड्यात तृणमूलच्या नेत्या अप्रिता घोष यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं ही जागाही सध्या रिक्त आहे. भाजपने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतही उमेदवार दिला नव्हता. त्यामुळं तृणमूलचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले.

भाजपकडून भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीकडं अधिक लक्ष्य दिलं जात आहे. या मतदारसंघातून खुद्द ममता बॅनर्जी उभ्या आहेत. मागील निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्रामध्ये त्यांचा पराभव केला होता. आता मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांना या निवडणुकीत विजय मिळवावा लागणार आहे. भाजपने या प्रियांका टिबरेवाल यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com