Ravi Shankar Prasad : देशात प्रत्येकासाठी एकच कायदा मग तुमच्यासाठी...; राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात भाजप देशभर आंदोलन करणार
Ravi Shankar Prasad
Ravi Shankar PrasadSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर शुक्रवारी (दि.२४ मार्च) त्यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. आता या टिकेला भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

Ravi Shankar Prasad
Rahul Gandhi On Adani : अदानींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणी गुंतवले? राहुल गांधींचा थेट मोदींना सवाल!

रविशंकर प्रसाद म्हणाले, ''राहुल गांधी यांच्यावर मानहानीचे 60 खटले सुरू आहेत. राहुल गांधींनी जाणूनबुजून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप देशभर आंदोलन करणार आहे.

राहुल गांधींविरोधात सुरतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडे मोठ्या वकिलांची फौज आहे. राज्यसभा आणि लोकसभेत मोठे वकील आहेत. मग राहुल गांधींच्या या प्रकरणात ते उच्च न्यायालयात का नाही गेले?'', असा सवाल यावेळी त्यांनी केला.

Ravi Shankar Prasad
Vidhan Parisad : काॅंग्रेसला कमी वेळ देता भाई जगतापांचा आरोप, सभापतींनी सभागृह केले तहकूब..

''राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र, तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. आता त्यांना शिक्षा झाली तर त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे राहुल गांधी हे सर्व राजकारण करत असून ते कर्नाटक निवडणुकीत त्याचा फायदा उठवण्याची सुनियोजित रणनीती आहे'', असा आरोपही त्यांनी केला.

''राहुल गांधी आज पुन्हा एकदा खोटं बोलले आहेत. मी लंडनमध्ये काहीही चुकीचं बोललो नाही, असं ते म्हणाले. आपण जिंकलो तर लोकशाही योग्य आणि हरलो तर लोकशाही वाईट आहे, असं त्यांच राजकारण आहे'', असं रविशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com